अयोध्येत जे घडले ते केवळ क्षणिक उन्मादाच्या भरात घडलेले आततायी, ‘उत्स्फूर्त’ कृत्य नव्हते तर एका कुटिल व्यूहातील एक खेळी होती. योजनापूर्वक घडवून आणलेली. रामराजयाचे ‘हिंदू स्वप्न’ साकार करण्याचे प्रलोभन दाखवणारे कमळ हे खरे तर हिटलरच्या स्वस्तिकाचे भारतीय रूप आहे हेच त्या कृत्याने सिद्ध केले. त्याविषयी हे काही.
अयोध्येत ६ डिसेंबर १९९२ च्या रविवारी बाबरी मशीद उध्वस्त केली गेली. त्या कृत्याचे साद - पडसाड गेले दोन- अडीच महीने आपण सर्वजण अनुभवीत आहोत. त्या घटनेच्या खरा अर्थ काय, भविष्यात काय घडणार आहे याचा वेध घेता येतो का आणि या सार्याचा मुकाबला कसा करायचा अशा सगळ्याचा मुद्यांवर विचारमंथन सुरू झाले आहे. ठोस आणि अचूक उत्तरे संभ्रमाच्या काळात मिळणे अवघड असते. पण अशा वेळी जे प्रश्न भेडसावत राहतात ते तरी नोंदवावेत, समविचारी लोकांबरोबर चर्चा करत वाट शोधावी असे सर्वांनाच वाटते आहे. हा असाच एक प्रयत्न.
कमळाआडचे स्वस्तिक
१९८४ पासून गेली काही वर्षे सातत्याने राममंदिराचा प्रश्न संघ परिवाराने लावून धरला होता. देशापुढे तोच एक राजकीय कार्यक्रम ठेवण्यात १९८९ च्या रथयात्रेपासून त्यांना मोठेच यश मिळाले होते. रामाचा उपयोग हा राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी होता. त्यासाठी एकजिनसी ‘हिंदू अस्मिता’ नव्याने निर्माण करण्यापासून ते या देशापुढील सर्व प्रश्नांचे, समस्यांचे खरे व एकमेव मूळ या देशापुढील सर्व प्रश्नांचे, समस्यांचे खरे व एकमेव मूळ या देशातील ‘मुसलमान’ आहेत हा समज लोकप्रिय व अधिकृत करण्यापर्यंतचे सर्व प्रयत्न संघ परिवारकडून केले गेले. हिटलरच्या नाझी पक्षाने ज्याप्रमाणे वंशवादाची व राष्ट्रीय समाजवादाची सांगड घालत, ज्यू’ विरोधी वातावरण उभे केले व राजकीय सत्ता काबीज केली, तशाच रणनीतीचा पुन:प्रत्यय संघ परिवाराच्या राजकारणातून येत आहे. संघ परिवारणेही-विशेषत: भाजपने – नवीन आर्थिक घोरणाला व त्यायोगे येणार्या परावलंबित्वाला विरोध दर्शवून वरवर पाहता राष्ट्रीय समाजवादी वाटेल अशी भूमिका घेतली व जमातवादी राजकरणाशी जोड करून राजकीय सत्ता बलकावण्याचे प्रयत्न जारी ठेवले. मुसलमानाच्या रुपाने सहज दिसू शकेल अशा शत्रूचा बागुलबुवा निर्माण करण्यात आला आहे. सत्ता काबीज करण्याचे पहिले पाऊल होते – अयोध्या. ‘मुसलमान’ राज्यकर्त्यानी हिंदूंवर मिळविलेल्या विजयाचे हे प्रतीक जे संघपरिवाराला राष्ट्रीय कलंक वाटत होते ते योजनाबद्ध तर्हेचे जमीनदोस्त केले गेले व कमळाआडचे स्वस्तिक अधिकच स्पष्ट झाले.
नाझी पक्षाप्रमाणेच एका बाजूने संसदिय लोकशाही व्यवस्थेचा सोईस्कररित्या फायदा उठवत दुसर्या बाजूला संस्था व संकेतांविरुद्ध युद्ध पुकारायचे ही चाल संघ परिवार खेळत आहे. अयोध्या प्रकरणी संसद, सर्वोच्च न्यायालय अशा ठिकाणी दिलेली वचने तोडून मशीद उध्वस्त केली गेली. पण चार राज्यातील भाजपाची सरकारे बरखास्त केल्यावर मात्र ‘घटनेच्या पावित्र्याचा’ भंग झाल्याचा त्यांना शोध लागला ! केंद्रीय सत्ता काबीज करण्यासाठी संसदीय लोकशाहीचा व निवडनुकांचा वापर करण्याचा संघ परिवाराचा मनसुबा जाहीर झालाच आहे. अयोध्येतील घटनेनंतर शक्य असेल त्या प्रत्येक व्यासपीठावरून संघ परिवाराचे नेते एकच धोशा लावीत आहेत की काँग्रेस सरकारने जनमताचा कौल गमावला आहे, सबब मध्यावधी निवडणूका घेतल्या जाव्यात. (हिटलरनेही निवडणूकांद्वारेच सत्ता मिळवली होती, कोणताही क्रांती करून नव्हे.)नाझींबरोबरचे दुसरे साम्य म्हणजे नाझींनी स्वत:ला कधी ‘पक्ष’ म्हणवून घेतले नाही, ‘चळवळ’ असल्याचे प्रतिपादन सातत्याने केले. संघ परिवाराकडूनही ‘राम मंदिर’ अभियान/आंदोलना’चे नारे दिले गेले व जात आहेत. समाजाच्या भुकेकंकाल थराला आवाहन आणि प्रचाराचा सातत्याने मारा हे आणखी एक साधर्म्य.
संघ परिवाराचे फाशिस्ट रूप आजचे आहे असा याचा अर्थ अजिबात नाही. हिटलरच्या ‘राष्ट्रभक्ती’ चे गुणगान, युद्धखोर मानसिकतेचा गौरव, हिंदू हे एक वंश म्हणून श्रेष्ठ असल्याचे ठसवणे, सामाजिक न्याय ही कल्पना धुडकावून लावून श्रेणीबद्ध सामजरचनेचे गोडवे गाणे (हाताची पाच बोटे कधी सारखी असतात का किंवा झाडाची पाने कधी सारखी असतात का असे दाखले देऊन सामाजिक विषमतेचे समर्थन करणे) हे सर्व गोळवलकर गुरुजींनी अथकपणे केले. ‘हिंदू राष्ट्र’ निर्मितीचे आपले उद्दीष्टही त्यांनी कधी लपवून ठेवले नव्हते. पण आणीबाणीविरोधी आंदोलनात (त्यात संघ परिवाराचा सहभाग हा खरे तर त्यांच्यावरील बंदीच्या निषेधापुरता होता) भाग घेतल्याने व त्यानंतर जनता पक्षाच्या प्रयोगामुळे ‘एक जबाबदार विरोधी पक्ष’ अशी एक अधिकृतता संघ परिवाराला मिळाली. त्याचा पुरेपूर फायदा उठवत आज देशाचे सर्व कार्यक्रम आपल्या धोरणानुसार व आपल्या निवडीच्या मुद्यांभोवती फिरत नोंद घ्यायला हवी. नवीन आर्थिक धोरण व त्यामुळे घडून येणारे रचनात्मक बदल यांना हळूहळू पण ठोसपणे होणारा विरोध वाढत चालला असताना अयोध्या प्रकरण घडावे हा केवळ योगायोग मानता येईल का ? आर्थिक-राजकीय प्रश्नावरील व साम्राज्यशाहीच्या विरोधात आंदोलन आता मागे पडेल व त्यांना आता त्यांचे लक्ष जमातवादाशी झगडण्यावरच केंद्रित करावे लागेल. याचा परिणाम म्हणून आर्थिक धोरण अबाधितपणे पुढे रेटले जाईल.) रथयात्रेच्या यशामुळे अधिकच चढेलपणाने मशीद उध्वस्त केली गेली आहे. कथित ‘हिंदू अस्मितेच्या’ या भयकारी प्रदर्शनाने संघ परिवार कधीही सत्ता काबिज करेल व जरी ताबडतोबीने मिळाली नाही तरी भय, द्वेष व हिंसेवर आधारित राजकारण सात्यताने चालूच ठेवेल अशी एक रास्त भीती उत्पन्न झाली आहे. संघ परिवाराचा मुकाबला करताना म्हणूनच कमळाआडच्या स्वस्तिकाचे खरेखुरे स्वरूप उघड करायला हवे व जनसामान्यांपर्यंत पोचवायला हवे. ‘ओठात राम पण पोटात नथूराम’ ही खेळी उघड करायला हवी.
संघ परिवाराकडून जी ‘हिंदू अस्मिता’ नव्याने निर्माण केली गेली आहे तिचाही वेध घ्यायला हवा. या देशातील विविध धर्म, पंथ, कर्मकांडे, उपासना पद्धती याबाबतीत जे वैविध्य आहे ते पूर्णतया नाकारून ‘हिंदू’ हा एखादा एकजिनसी, एकसंध पदार्थ असावा अशी मांडणी केली जाते. ह्याला विरोध व्हायला हवा.
संघ परिवार ठरवेल ते ‘हिंदुत्व’ अशी मांडणी लोकमान्य झाली तर केवळ वेगळे आहेत या कारणावरून समाजातील विविध गटांना कायम दुय्य्म पातळीवर ठेवले जाईल. वैविध्य चिरडून टाकायचा प्रयत्न होईल. त्याचप्रमाणे हिंदू धर्मांतर्गत जी एक उतरंडीची, जातीबद्ध, वर्णबध्द रचना आहे तिच्या विरुध्दचे लढेही चिरडून टाकले जातील. हिंदू हे मुसलमानांपेक्षा, किंबहुना जगातील इतर सर्वच मानवांपेक्षा नैतिक, आध्यात्मिक, वंशदृष्ट्या श्रेष्ठ आहेत या मांडणीमध्ये हाच डाव आहे. याच हिंदू धर्मांतर्गत स्त्रिया व दलित यांचे काय स्थान आहे हा प्रश्न सातत्याने उभा केला पाहिजे. संघ परिवाराच्या अयोध्येतील कृत्याचा निषेध करताना हे कृती हिंदूंच्या उदार, विशाल, सहिष्णु परंपरेला स्त्रिया काळिमा फसणारे आहे असे म्हटले जाते. पण उदार, विशाल, परंपरेत स्त्रिया आणि दलित यांना माणूस म्हणून मानाने जगता येईल अशी अवस्था आहे का हा प्रश्न त्याचबरोबरीने उठवला जात नाही.
हा मुद्दा उपस्थित करणे महत्त्वाचे आहे कर्ण अयोध्येची प्रतिक्रिया म्हणून ज्या जातीय दंगली उसळल्या, मुसलमानांना ‘लक्ष्य’ बनवून त्यांच्यावर हल्ले चढवले गेले त्या भयकारी वातावरणात अनेक पुरोगामी लोकांनीही मुसलमानांना ‘आता वेळीच सुधारा’ असे बजावायला सुरुवात केली आहे. एका बाजूला संघ परिवाराच्या हिंदू समाजाचे एकसंधीकरण करण्याच्या प्रयत्नावर टीका करताना ‘हे उदार, सहिष्णु हिंदू परंपरेला धरून नाही’ असे म्हणायचे व दुसर्या बाजूला मूसलमांना ‘वेळीच सुधारा’ म्हणायचे ही मांडणी अपुरी आहे. हिंदू समाजाचे स्वरूप एकजिनसी करण्याला विरोध करत असताना हिंदू समाजाचे स्वरूप एकजिनसी करण्याचा विरोध करत असताना हिंदू समाजातील अंतर्विरोधांवरही बोट ठेवले पाहिजे असे वाटते.
संघ परिवाराकडून जो हिंदुत्ववाद प्रतिपादिला जात आहे त्याच्या काही वैशिष्ट्याचेही विश्लेषण व्हायला हवे. हिंदू धर्मात एक प्रेषित, एक धर्मग्रंथ आणि एक उपासनापद्धत अशी व्यवस्था नाही. असे अजूनही राम हा जणू एकच देव असावा अशा पद्धतीने संघ परिवाराने ‘जय श्री राम’ चा नारा दिला आहे. (‘मधू किश्वर यांचा एक मुद्दा इथे महत्त्वाचा आहे. आजपर्यंत ‘जय सियाराम’ म्हणजे ‘जय सीताराम’ अशी घोषणा जनसामान्य देत असत. संघपरिवारच्या स्त्रीला दुय्य्म लेखण्याच्या तत्त्वज्ञानामुळे व एकच देव ठसवण्याच्या गरजेमुळे संघपरिवाराने सीता गाळून ‘जय श्री राम’चा नारा दिला ! आपल्या सोईपुरता लोकश्रद्धेचा वापर करण्याच्या संघ परिवाराच्या नीतीला हे धरूनच आहे.)

त्याचप्रमाणे संसदिय लोकशाही असणार्या देशात स्वत: प्रमुख विरोधी पक्ष असूनही एक समांतर अशी ‘धर्मसंसद’ स्थापून तिच्याद्वारे निर्णय घेण्याचा चाल संघ परिवार खेळत आहे. ही धर्मसंसद कुणी निवडली, कुठून अवतरली ? अयोध्येबद्द्लच्या विविध वार्तापत्रांमधून आलेल्या वर्णनांनुसार महागड्या मोटारिंमधून फिरणारे आणि प्रसंगी आई-बहीणींवरुन शिव्या देणारे हे साधू कोण ? ज्या धर्मसंसदेत चारही पीठांचे शंकराचार्य नाहीत ती संसद समस्त हिंदूंची प्रतिनिधिक कशी ठरते ? हे प्रश्न उठवायला हवेत. घटना व सर्वोच्च न्यायालय तसेच लोकसभा या संसदिय लोकशाहीच्या प्रमुख घटकांना डावलून धर्मसंसद उभारणे हा लोकशाहीवरचा घाला आहे हे जनसामान्यापर्यंत पोचवायला हवे. स्त्रिया आणि दलितांविषयी या धर्मसंसदेची काय भूमिका आहे हे तपासायला हवे. सध्याची घटना बदलून ‘हिंदू राष्ट्र’ संकल्पनेवर आधारीत नवीन घटना बनवण्याचा आग्रह तसेच राखीव जागांच्या विरोधात भूमिका अशा दोन मागण्या या धर्मसंसदेकडून एव्हाना केल्या गेल्या आहेतच. लाखो लोकांची ‘श्रद्धा’ असलेले राममंदिर कुठे बांधायचे हेही धर्मसंसदच ठरवणार आहे. आत्तापर्यंत हिंदू धर्म विकेंद्रित स्वरूपाचा होता त्याला एककेंद्री बनण्यासाठी धर्मसंसद निर्माण केली जात आहे हे लोकांपर्यंत निर्माण केली जात आहे हे लोकांपर्यंत पोचवायचे हवे.
स्त्रियांच्या दृष्टीने तर हे जास्त म्हत्त्वाचे प्रश्न आहेत कारण संघ परिवार आपल्या विविध राजकीय कृतींमधे बर्याच मोठ्या स्ंख्येने स्त्रियांचा सहभाग मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. अधिकाधिक स्त्रिया राजकारणात, सार्वजनिक जीवनात भाग घेऊ लागल्याचे हे एक लक्षण आहे. सार्वजनिक जीवनात भाग घेण्याचे प्रमाण कोणत्याही कारणाने का होईना वाढते ही स्वागतार्ह बाब आहे असे आम्हाला वाटते. पण या स्त्रियांचा स्त्रीविरोधी असणार्या राजकारणासाठी वापर होतो आणि स्त्रिया तसा तो होऊ देत आहेत ही आम्हाला चिंतेची बाब वाटते. दुर्गावाहिनी, स्त्रीशक्ती वा राष्ट्रसेविका समिति यांच्याव्दारे स्त्रियांना संघटित करण्याचे प्रयत्न संघ परिवाराकडून केले जातात. या संघटनांच्या द्वारे कोणते आदर्श या स्त्रियांपुढे ठेवले जातात. ‘आदर्श स्त्री’चे कोणते रूप त्यांच्यासमोर ठेवले जाते हे तपासायला हवे. ‘राष्ट्राची’ गरज असेल तेव्हा स्त्रियांनी सार्वजनिक जीवनात यावे यासाठी नेहमीच प्रयत्न केले गेले आहेत. स्त्रियाही मोठ्या स्ंख्यने घराबाहेर पडल्या आहेत व ‘राष्ट्रपुढेचे’ संकट टळण्यावर आता स्त्रियांनी ‘आदर्श पत्नी व माता’ बनून राष्ट्रसेवा करावी असे सांगून त्यांना पुन्हा एकदा भिंतीआड ढकलेले गेले आहे अशी अनेक उदाहरणे आहेत. संघ परिवाराकडून हेच केले जाणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने स्त्रिया सामील झाल्या तरी ‘पितृभू’ च्या लढाईत कोणत्याही निर्णयप्रक्रियेत त्यांना सामावून घेतले जाणार नाही हे उघड आहे. असे वाटण्याइतका सबल पुरावा संघ परिवाराकडून दिला गेला आहे. मध्यप्रदेश व उत्तरप्रदेशात भाजपची राजवट असताना जी पाठ्यपुस्तके लिहिली गेली व त्यात स्त्रीचे जे आदर्श म्हणून रूप मांडले गेले तो आदर्श पारंपारिक स्त्रीचा, चूल व मूल हेच तिचे जग, कुटुंबासाठी स्वार्थत्याग हेच तिचे जीवन इ. गोष्टींचाच होता.
अयोध्येची प्रतिक्रिया म्हणून ज्या दंगली उसळल्या, विशेषत: मुंबईमध्ये. दुसर्या टप्यात ज्या दंगली पद्धतशीरपणे उसळल्या गेल्या त्या दंगलीमधील स्त्रियांचा तसेच काही प्रसंगी दलितांचा सहभाग ही गोष्टही चिंताजनक आहे. मुंबईत प्रत्यक्ष दंगलीत भाग घेतलाच पण पोलिस ठाण्यात ‘उत्स्फूर्त’ मोर्चे काढून, घेराव घालून ज्या दंगलखोरांना पोलिसांनी पकडले होते त्यांना सोडवून आणण्याचे कामही केले. स्त्री ही निसर्गत:च शांतप्रेमी, हिंसाविरोधी वा जमातविरोधी असते हा जीवशास्त्रीय नियतवाद जरी यात पराभूत झाला असला तरी स्त्रियांना ‘एक लढाऊ शक्ती’ म्हणून राजकीय पक्षाकडून केवळ वापर होतो. निर्णयप्रक्रियेत स्त्रियांना स्थान, अधिकार दिले जात नाही हेही पुन्हा एकदा ठसठशीतपणे पुढे आले.
हिंदू धर्मांतर्गत पराकोटीचे अन्याय, अत्याचार सहन करावे लागत असूनही दलित समाजही काही ठिकाणी मुसलमानांच्या विरुद्ध हिंदू जातियवाद्यांबरोबर गेला ही देखील अशीच एक चिंतेची बाब आहे. हिंदू एकसंधीकरणाच्या डावानुसार संघ परिवाराकडून आंबेडकरांना एक ‘हिंदू सुधारक’ म्हणून स्वत:च्या छत्रीखाली घेण्याचा प्रयत्न चालूच आहे. फाशिझमचं आकर्षण वंचित. भुकेकंकाल घटकांना स्वाभाविकपणे वाटणार म्हणून हा प्रश्न जास्त गंभीर आहे.
मुंबईच्या दंगलीबद्दल- विशेषत: जानेवारीतील- आता असा एक समज पसविण्यात येत आहे की ही दंगल खरी जातीय दंगल खरी जातीय दंगल नव्हती तर राजकारणी- गुंड- बिल्डर यांनी संगनमताने घडवून आणलेली दंगल होती. हे प्रतिपादन अपुरे आहे. राजकारणी- गुंड- बिल्डर यांनी स्वत:च्या कारवाया यापूर्वीही केल्या आहेत. त्यासाठी त्यांना दंगल पेटवण्याची गरज नव्हती. उलटपक्षी जातीय विद्वेषाने भारलेले वातावरणाचा त्यांनी फायदा उठवला. पण एक गोष्ट कधीही नजरेआड करता येणार नाही की दंगलमागे सुत्रधार कुणीही असले तरी लक्ष्य मात्र ‘मुसलमान’चं होते ! सर्वसामान्य जनतेच्या मनात, घरात व कामाच्या ठिकाणी ‘ते व आपण’ ही दुही निर्माण झाली आहे. नुसते मुसलमानच नव्हते तर इस्लाम हा एक धर्म म्हणूनही वाईट आहे हा नवहिंदुत्ववादी प्रचार मूळ धरू लागला आहे, ‘एकदा अद्दल घडायलाच हवी होती’ ही बहुसंख्यांच्या मनात आहे ही वस्तुस्थिति नजरेआड करून ‘दंगा लगाते लीडर लोक मरते है’ ही अर्धसत्य व स्वत:चीच फसवणूक करणारी घोषणा देऊन आपली जमातवादाविरूद्धची लढाई पुढे रेटता येणार नाही. सामान्य लोकांच्या भावना, धर्माचे त्यांच्या जीवनातील स्थान काय व ते समजून घेऊन, संवाद करीतच पुढे जायला हवे आहे.
(हा लेख लिहितांना डॉ. संदीप पेंडसे, अजित राय, डॉ.लता मणी व डॉ.माधव चव्हाण यांच्या लिखाणाचा तसेच ‘इंडिया टूडे’ मधील लिखाणाचा खूप उपयोग झाला आहे. त्याबद्दल त्या सर्वांचे मन:पूवर्क आभार.)