…….लैंगिक सुख हवं. ते नित्यनवं असावं. जास्तीतजास्त मिळत राहावं. शिळा, तोचतोचपणा नको तर, विलक्षण, थरारक अनुभव मिळत राहावा. या अतृप्त भुकेची परिणती म्हणजेच आजचा अश्लील वाङ्ग्मयाचा वाढता प्रसार. ब्ल्यू फिल्मना मिळणारा प्रचंड प्रतिसाद, लैंगिक विकृतींचे दडपून टाकणारे प्रमाण, हिंसाचाराने व बाजारूपणा ग्रासलेला लैंगिक व्यवहार…... हा या लेखाचा संदर्भ.
‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ असं म्हटले जाते. याचा साधा अर्थ म्हणजे कोणत्याही दोन व्यक्ती समान नाहीत. उत्तम शिल्पकाराला प्रत्येक पत्थराचे अंतरंग म्हणजे नवीन आव्हान असते. ते स्वीकारलं आणि पेललं म्हणजे नवीन कलाकृती घडते.जर शिल्पकाराचा पत्थर, चित्रकाराचा कॅनव्हास यातून नवीन कलाकृती घडू शकते, तर प्रत्येक मानवी आयुष्य कलाकृती का ठरू नये? जीवन जर कलाकृतीसारखे सुंदर व्हायचे तर प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे वैशिष्ट्य जपलं आणि फुलवलं पाहिजे. एका छापाच्या गणपतीप्रमाणे माणसे आणि त्यांचे परस्पर व्यवहार एका छापाचे होता कामा नयेत.
शृंगार आणि लैंगिकता यांच्या संदर्भात अश्लीलता आपणास एका साच्यातून काढते. प्रेम कोणावर करायचे, तर सिनेमा नट – नाटयांप्रमाणे “सुंदर असणाऱ्या” व्यक्तींवर, प्रेम कसे करायचे तर श्रीदेवी - अनिल कपूर (किंवा अशाच एका फिल्मी अथवा जाहिरातीतील जोडी.) यांच्यासारखे, शृंगार कसा करायचा, तर अनेक सौंदर्यप्रसाधने आणि जाहिरातीतील कपडे वापरून काश्मीर, अशा ठिकाणी धावाधाव करत शृंगार करायचा आणि लैंगिकता कशी व्यक्त करायची तर अश्लील वांगमया नुसार व्यक्त करायची. सारे साचे ठरून गेले आहे. आपण आपली सर्जकताच गमावून बसलो आहोत. मजनूच्या नजरेतून लैलाकडे पाहण्याची कुवत कुठे गेली? प्रेमातून दुसऱ्या व्यक्तीस सुंदर करण्याची क्षमता तयारच झाली नाही का? भस्मचर्चित, रुंडमाळा घालणारा बैरागी शिवशंकर पार्वतीस प्रिय आणि म्हणून सुंदर जाणवू शकतो. ती नजर का हरवली? शृंगारमय झालेली सूरदासांची राधा कृष्णाला म्हणते, “तू राधा हो. मी कृष्ण बनून तुझ्यासारखी बासरी वाजवेल.” शृंगाराचा हा पोत किती देखणा आहे! हे देखणेपण हाती यायच्या आधीच हरवलं? लैंगिकतेमध्ये तर स्त्रियांनी ‘ते किळसवाणे’ कृत्य कर्तव्य म्हणून करून घ्यायचे आणि पुरुषांनी मर्दुमकीचा विजय घोषात जेतेपण मिरवायचे. हा सर्वच प्रकार फार फार विकृत आहे. आपण त्यात आपलं माणूसपण हरवून बसतो.
विकृतीच्या अनेक तर्हा आहेत. मानवी लैंगिकतेशी संबंधित विकृती जोपासल्या जाण्याचं एक महत्त्वाचं कारण अश्लीलता आहे. ही कधी किळसवाण्या नागड्या स्वरूपात तर कधी ‘शास्त्रीय लैंगिक ज्ञान’ देण्याच्या बुरख्या आडून आणि ‘स्वातंत्र्य, कला - कल्पनाविलास या नावाखाली सर्रास थैमान घालत, मानवी जीवनच अंधार्या रात्रीप्रमाणे काळवंडत आली आहे .या अंधारात स्वतःच्या इच्छा - आकांक्षा, लैंगिकता आणि शृंगारातील स्वतःचे वेगळेपण, समाधानाचा सूर काही म्हणता काही हाती लागत नाही. एक घोर निराशा एकारत जीवन व्यापून टाकते.
अश्लीलता मैत्रीतल्या भिंतीचित्रातून, अक्षर वांग्मयतून, चित्रपट - व्हिडिओ पार्लर्समधून, काही विदेशी फोटो मासिकांतून जशी प्रगटते तशीच ती ‘पुरुषी’ विनोदातून , शिव्यांतून, रस्त्याने जाताना दिल्या जाणाऱ्या धडकांतून, अनोळखींच्या वक्षांवरून फिरणाऱ्या ओशाळवाण्या ‘सभ्य नजरांतून’ जीवनात वावरते.
ग्रामीण - शहरी भाग, उच्चभ्रू कनिष्ठ स्तर, लहान - मोठे, विकसित - अविकसित देशातील समाज या साऱ्या भेदांना व्यापून अश्लीलता दशांगुळे उरलीच आहे. ‘ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ’ शोधणं जसं जिकिरीच असतं तसंच अश्लीलतेचा मानवी इतिहासातील उगम शोधणं देखील कष्टप्रद आहे. परंतु, अश्लीलतेचं आजचं प्रयोजन पाहणं, तिची व्याख्या करण्याचा प्रयत्न करणं तुलनेनं सोपं आहे. या प्रयत्नातून अश्लीलतेची अंधारी रात्र नष्ट करनं कदाचित शक्य होईल म्हणून हा खटाटोप!
अश्लीलता अशी रुजते!
प्राण्यांप्रमाणे मानवी प्रणयाराधन काही निसर्ग चेतनातून होत नाही. विशिष्ट ऋतू ‘माजावर’ येण्याचा काळ, ‘गंध’ या चेतना मानवी विकासक्रमात जवळपास लोकल्यागत आहेत. त्यांची जागा इच्छा, सामाजिक संकेत, अपेक्षा या माध्यमातून होणाऱ्या साद-प्रतिसादांनी घेतली आहे. वय वाढताना या सार्या गोष्टींचे मिश्रण मानवी मनात आकारत असते. त्यातून मानवी मनाची जडणघडण होतानाच प्रकृती विकृतींचा हातभार लागतो. अश्लीलतेची विकृती कळत-नकळत वय वाढता – वाढता आपला भाग बनते. तिचे व्यसन देखील जडते. अश्लीलतेचा संबंध प्रामुख्याने पुरुषी भावविश्वाशी आहे असे मला तरी अश्लीलतेच्या आशया (Content) वरून वाटते. पुरुषांसाठी प्रामुख्याने तयार झालेल्या अश्लीलतेचा ‘आस्वाद’ स्त्रियाही घेत असतील, नाही असे नाही. परंतु, माझ्या आजूबाजूस तरी असे प्रमाण अत्यल्प दिसले आहे. खूप वेळेला सोबतच्या पुरुषाच्या (प्रियकर, पती या स्वरूपातील) इच्छेखातर हा ‘आस्वाद’ घेतला जातो.
‘मी तेवढा सभ्य’ अशी प्रौढी कुणी पुरुषाने मिरवू नये अशी स्थिती आहे. स्वतःचा भूतकाळ त्रयस्थपणे मनाच्या आरशात पाहण्याचा प्रयत्न केला की अनेक गोष्टींची उकल आपोआपच होईल. ७ ते १० वर्षांपर्यंत अनेक शिव्या आत्मसात होतात. ‘स्त्रियांचा रक्षणकर्ता’ या बिरुदास शिव्यांच्या सहाय्याने नालायक ठरवून स्वतःची मर्दानगी शाबीत करण्याची प्रक्रिया याच काळात आकरू लागते. १० ते १५ वर्षांपर्यंत केव्हा तरी लैंगिकतेचा अर्थ कळू लागतो. संध्याकाळी अंधार पडायला लागल्यावर ‘चावट’ विनोदांच्या झडणाऱ्या फैरी, शाळांच्या मूत्र्यांतील भिंतीवरील ‘कलाकृती आणि साहित्य’ लिहिले - वाचले जाणे, मुलींच्याबद्दल वाढते आकर्षण आणि स्वतःच्याच तोर्यात मिरवत जाणाऱ्या मुलींबद्दल राग-द्वेष -असूया, मुलींप्रमाणे सौंदर्य-प्रसाधने वापरण्याची इच्छा, पण आज येणारे संकेत, भीत-भीत टाकलेले कमेंट या गोष्टी प्रस्तुत वयात घडू लागतात. १५ ते २० दरम्यान मिसरूड फुटू लागलेले, शैक्षणिक अथवा आर्थिक आणि शारीरिक भरदारपणा यांचा, मुलींवर छाप पडण्यासाठी हत्यार म्हणून, वापर करण्याची मनीषा, अश्लील वांग्मय चोरून पाहणे- वाचणे पाहणे, दुसऱ्यावर बळजबरी करण्याची तीव्र होणारी भावना यांना मित्रकंपूमधून मिळणारे प्रोत्साहन, ‘ओरबाडून घ्यायचा प्रतिसाद’ हे ‘पुरुषी लक्षण’ अशा गोष्टी या वयात मनात रुजू लागतात. पुढे त्यांचे व्यसन जडते. सभ्यतेची झूल आतील असभ्यता फाडत असते. एक केविलवाणी दुतोंडी धडपड चालू राहते. हे व्यसन वयाच्या कोणत्याही टप्प्यावर साथ देऊ शकते. मानवी लैंगिकतेचे साचे एका छापातून आपल्याला घडवत जातात. ‘तेथे दिसलं पाहिलं’ ते समाधान अशी लैंगिक समाधानाची व्याख्या घडते. अतिमानवी अपेक्षा भक्कम बनून जन्मभर असमाधानाचा सूर धरतात. ओरबाडून सुख घेण्याचे प्रसंगी त्यासाठी बाळाचा अथवा हिंसेचा वापर करण्याचे बाळकडू याच २० ते २५ वयापर्यंत मिळत असते. या कालपटावर प्रत्येकाने स्वतःला जरूर निरखून - पारखून घ्यावे.
अश्लीलतेचे प्रयोजन
विविध माध्यमांतून आणि जीवनाच्या काही अंगातून अश्लीलता पुन्हा पुन्हा का प्रकटत राहिली आहे, हा एक क्लिष्ट प्रश्न आहे. अश्लीलतेच्या वातावरणात वाढताना चोरटेपणा, अपराधीपणा, कोडगेपणा, हिंस्त्रता या जीवन कुरूप करणाऱ्या करणाऱ्या भावना कमी अधिक प्रमाणात मनात घर करतात हा सार्वत्रिक अनुभव आहे, या भावनांशी साहचर्य काही सुखाचे ठरत नाही. तरी प्रत्येक पिढी जवळपास अश्लिलतामिश्रित वातावरणात वाढली आहे आणि वाढते आहे. स्त्री मुक्ती विचार पटलेल्या, आचरणात आणू पाहणार्या स्त्रियांनादेखील स्वतःच्या वाढत्या वयातील मुलांशी या संबंधात कसा संवाद साधायचा हा प्रश्न पडतो.
सध्या माध्यमे वाढली आहेत, त्यांचे व्यापारीकरण झाले आहे, ‘जे खपते ते विकते’ या तत्वानुसार अश्लीलता फोफावते आहे असे स्पष्टीकरण विस्ताराने देता येईल; त्याविरुद्ध कायद्याने परिणामकारक बंदी असण्याची भाषा करता येईल. कदाचित तशी बंदी आणताही येईल. परंतु, त्यामुळे अश्लीलता नष्ट होईल हा भ्रम आहे. कारण, जेव्हा या माध्यमांचा सुकाळ नव्हता, तेव्हाही अश्लिलता होतीच की! वेश्याव्यवसाय तर इतिहासातील सर्वात पुरातन व्यवसाय म्हणविला जातो. त्यासोबत अश्लीलता होतील, आजही आहे. तेव्हा प्रसिद्धी माध्यमे हे काही अश्लीलतेचे कारण नाही. ते तर केवळ अश्लीलता प्रसाराचे माध्यम आहे. या विकृतीचेही काही प्रयोजन असले पाहिजे. त्याचा छडा लागणे महत्त्वाचे आहे.
आधी म्हटल्याप्रमाणे मानवी लैंगिकता इतर प्राण्यांप्रमाणे निसर्ग – चेतनांवर फारशी अवलंबून नसल्याने, प्रत्येक पिढीस ती बाहेरून म्हणजे आजूबाजूच्या समाजातून आत्मसात करावी लागते. अश्लीलतेचे हे एक प्रयोजन सांगितले जाते. मानवी लैंगिकतेमध्ये शरीरशास्त्रीय कुतूहल आहे. वास्तविक हे कुतूहल शरीरशास्त्राच्या अभ्यासातून शमवले जाऊ शकते. परंतु जेथे डॉक्टर घडतात त्या विद्यार्थी-वसतिगृहातून अश्लीलसाहित्याचा सुकाळ पाहता शरीरशास्त्रीय माहिती, लैंगिक शिक्षण या गोष्टी दुय्यम महत्त्वाच्या म्हणाव्या लागतील. या दुय्यम महत्त्वाच्या गोष्टींवर देखील भरपूर वाद होतात. शाळांतून लैंगिक शिक्षण दिल्यास ‘व्यभिचार वाढेल अशी ओरड अधून-मधून ऐकू येतेच. अश्लीलतेच्या चोरट्या आणि अशास्त्रीय मार्गापेक्षा सरळपणे शास्त्रीय पायावर आधारित असे लैंगिक शिक्षण ७ वी ते १० पर्यंत दिले जाणे आवश्यक आहे. केवळ शाळांतून नव्हे तर घरी पालकांमार्फतदेखील मुला-मुलींच्या या विषयातील प्रश्नांचे समाधान झाले पाहिजे. विषय नाजूक आहेत. तो जबाबदारीने शिकविला जाणे महत्वाचा आहे. या स्थितीत पालकांनी बेफिकीर राहणे बेजबाबदारपणाचे ठरेल . हे घडावे म्हणून प्रयत्न करणे महत्त्वाचे आहेत. परंतु लैंगिक शिक्षण दिल्याने अश्लीलतेचा प्रश्न सुटेल असा भ्रम बाळगला जाऊ नये.
भारतीय समाजात स्त्री - पुरुषांनी विविध वयात एकत्र येणे दुरापास्त ठरते. सामाजिक संकेतांचा काच एवढा प्रचंड आहे, की एकत्र वाढताना इतर अनेक विषयांसोबत लैंगिकतेचे, शृंगाराचे आणि प्रणयाराधनाचे घडे आपसूक मिळणे अशक्य आहे, तेवढी मोकळीक नाही. त्यामुळे अश्लीलता बोकाळते किंवा ही पोकळी अश्लीलता भरून काढते असा दुसरा युक्तिवाद पुढे केला जातो. परंतु, यात देखील फारसे तथ्य नाही हे पाश्चात्य जगाकडे दृष्टिक्षेप टाकल्यास स्पष्ट होईल. युरोप-अमेरिकेत हे स्वातंत्र्य जास्त मोठ्या प्रमाणावर आहे. शालेय शिक्षण पूर्ण होण्याआधीच मुले-मुली मोठ्या प्रमाणावर एकत्र येतात. त्यातून निर्माण होणाऱ्या किशोरवयीन मातांचे आणि अपत्यांचे प्रश्न माणुसकीच्या भावनेतून सोडवण्याचे प्रयत्न कौतुकास्पद असले तरी फारच अपुरे आहेत. शिवाय अशा माता आणि बेवारशी अपत्यांच्या उध्वस्त होणाऱ्या मानसिकतेचे काळजी घेतली जात असेल हा प्रश्नच आहे. हे सारे प्रश्न असले तरी तेथे स्वातंत्र्य जास्त असल्याचे आपणास मान्य करावे लागेल. या स्वातंत्र्याने अश्लीलतेला लगाम घातल्याचे तेथे दिसत नाही. उलट, सौम्य आणि हार्ड पोर्नोग्राफीचे आगार म्हणजे युरोप-अमेरिका असे समीकरण रूढ झाले आहे. अत्यंत बाजारूवृत्ती, जे खपेल ते विकावे; शस्त्रास्त्रे विकून, युद्धांचा वणवा पेटता ठेवून, चरस -अफू -गांजा –एल एस डी अथवा अश्लीलता विकून झटपट पैसा करावा ही नफेखोर वृत्ती तेथे आहे. मानवी नाती आणि परस्परांबद्दल आदर ही मानवी मुल्ये नफेखोरी हरवली आहेत. नव्या पिढीत मुला मुलींचे संबंध स्नेहार्द्र असणे अशक्यप्राय झाले आहे. अश्लीलता वाढली नाही तरच आश्चर्य वाटावे, अशी तेथे परिस्थिती आहे. हे नफेखोर वातावरण मुला-मुलींना जास्त स्वातंत्र्य मिळावे असे प्रयत्न झाले पाहिजेत. त्यातून व्यक्तीविकास साधला गेला पाहिजे. सामाजिक संकेतांचा काच दिला झाला पाहिजे. अपघाताने, अंदाज चुकले, पाऊल घसरले तरी त्या व्यक्ती कोलमडून न देता पुन्हा मानसिक उभारी मिळाली पाहिजे. यासाठी पालकांची शिक्षणसंस्थांची आणि इतर सामाजिक संस्थांची मानसिकता नव्याने समजूतदार पायावर घडवली गेली पाहिजे.
अश्लीलता नष्ट व्हायची तर परस्पर आदरातून मानवी लैंगिकता व्यक्त होणे महत्वाचे आहे. या संदर्भात विविध कलाकृतींचा मोठा सहभाग असू शकतो. सूरदासांची राधा, मीरेचा कृष्ण, जनीचा विठू या काव्यातून भक्तीच्या आवरणात शृंगार आहे. शृंगाराचा विटाळ मानायचे कारण नाही. खजुराहो आणि सूर्यमंदिरातील मैथुन-शिल्पांच्या एकंदरीत मांडणीतून शृंगार आहे. ‘मालवून टाक दीप’ अथवा ‘समईच्या शुभ्र कळ्या’ या काव्यातील भट आणि आरती प्रभू यांनी व्यक्त केलेला शृंगार सुंदर आहे. स्त्री-पुरुष संबंधांची, त्यातील सौंर्द्याची आणि विकृतींमुळे आलेल्या कुरूपतेला बाजूला काढू पाहणारी अभिव्यक्ती सामाजिक जीवन जास्त सुसंस्कृत करत असते. चांगले शृंगारिक साहित्य ही देखील समाजाची गरज आहे. शृंगाराला नाके मुरडायची आणि अश्लीलता चोरटेपणे जपायची ही दांभिकता सोडण्याची गरज फार प्रकर्षाने जाणवते. शृंगारिक साहित्याच्या अभावाची भरून काढणे हे अश्लीलतेचे एक प्रयोजन म्हणून पुढे केले जाते. उत्तम दर्जाच्या शृंगार-साहित्याच्या निर्मितीमध्ये रूढ भाषेची अडचण आहे . तिच्या ओघात पुढे विचार करायचा आहे.
शृंगार आणि अश्लीलतेमधील फरक
अश्लीलता म्हणजे नेमके काय, या प्रश्नाचे उत्तर न देता, सर्वसाधारणपणे अश्लीलतेच्या मान्य आत्तापर्यंत आपण चर्चा केली. कलाकृतींची चर्चा करताना श्लील-अश्लील यांच्या भेदावरून वारंवार काथ्याकूट केला जातो. कधी कधी तर कोर्ट केसेस झालेल्या आहेत. चि. त्यं. खानोलकरांचे ‘अवध्य’ हे नाटक अश्लील आहे. म्हणून ओरड झाली होती, ‘बलात्कार कसा करतात’ ही अनिल थत्तेंची पुस्तिका अश्लील नाही असे तिचे पुरस्कर्ते म्हणतात. हा विरोधाभास पाहता गरगरायला होते.
प्रेम, शृंगार, प्रणयाराधन, मैथुन यांचे मानवी जीवनातील स्थान सौंदर्यपूर्ण असू शकते, नव्हे ते तसे असावे अशा आग्रहापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. प्रेम शृंगार-प्रणयाराधन-मैथुन यांसाठी “लैंगिकता” हा शब्द यापुढे आपण सोयीसाठी वापरूया. मानवी जीवनाचा लैंगिकता हा अविभाज्य आणि अर्थपूर्ण भाग असला तरी लैंगिकता म्हणजे संपूर्ण मानवी जीवन नव्हे ही खूणगांठ देखील पक्की पाहिजे. जी लैंगिकता मानवी व्यक्तिमत्त्वाचा भाग बनून येते, जी मध्ये व्यक्ती वैशिष्ट्ये पुसली जात नाहीत, जी परस्परांत सादप्रतिसाद घालत फुलाप्रमाणे उमलत राहते त्या लैंगिकतेमध्ये अश्लीलता नाही असे सरळ म्हणावे.
हे जरा उदाहरणाने स्पष्ट करून पाहू. सकाळ ते रात्र एकत्र असणारी जोडपी दिवसभरात घरकाम, वाचन, एकत्र नाटक-सिनेमा, व्यवसाय यात गर्क असतात. चहा घेता घेता चार सुखदुःखाच्या गप्पा मारतात. उदाहरणादाखल घेतलेला दिवस हाच काही त्यांच्या जीवनाचा एकमात्र दिवस नसतो. त्याला भूतकाळ आणि उद्याची स्वप्ने असतात. त्यात कितीतरी भावनिक देवाणघेवाण असते. याचाच भाग म्हणून त्यांचा शृंगार असतो, मैथुन असते. ही लैंगिकता त्या जोडप्याचे जीवन जास्त अर्थपूर्णपणे फुलावीत असते. सुंदर करीत असते. कल्पना करा की, केवळ या मैथुनाची चित्र-फीत तयार केली आहे. ती फीत पाहताना जीवनाची बाकी अंगे चित्रीत न झाल्याने दिसत नाहीत. येथे मैथुन हे जणू संपूर्ण जीवन म्हणून समोर येते. ही चित्र-फीत अश्लील ठरते. परंतु, जर उत्तम दिग्दर्शकाच्या हातून या जोडप्याचे सहजीवन, त्यातील सुखदुःखे, ताण-तणाव हे सारे घेऊन एखाद्या चित्रपट आला, मैथुनातून जी प्रेमाची देवाण-घेवाण होते ती केंद्रस्थानी ठेवून त्या संदर्भात आवश्यक तेवढा शृंगारा आला, तर तो चित्रपट उत्तम कलाकृती होऊ शकतो.
मानवी व्यवहारातील व्यामिश्रता, गुंतागुंत, देवाण-घेवाण टाळून त्यांना केवळ शारीरिक पातळीवर आणण्यात आहे. अश्लीलतेची पुढची पायरी मानवी व्यवहार केवळ शारीरिकच नव्हे तर लिंग-योनी, मांड्या, स्तन, कुल्ले अशा शरीर अवयवांच्या पातळीवर गोठविणे ही आहे. मानसिकता नाकरत, मैथुनाची निगडित नसलेल्या बाकी शरीर नाकारत जाताना आपण केवळ स्वतःलाच नकार देत नसतो तर इतर व्यक्तींना नाकारतो. दुसऱ्या व्यक्तीचे शरीर म्हणजे स्वतःच्या शरीराचा एक विधी उरकण्याचे साधन ठरते. त्यातून बळजबरी, शरीरबळाचा स्त्रीविरुद्ध वापर, हिंसाचार यांचा जन्म होतो. ही अश्लीलतेची आजची सर्वात वरची पायरी आहे. हार्ड पोर्नोग्राफी, ट्रिपल एक्स ही तिची लेबले आहेत. दुसऱ्याला फुलवत स्वतः फुलण्याची किमया करंटेपणाने टाळून, स्वतःला नाकारून दुसर्याला नाकारण्याचा आणि त्यातून विजेत्या योद्ध्यांचा उन्माद मिरवित अश्लीलता सारे जीवनच अर्थहीन बनवते. पुरुषांना स्वतःचे व्यक्तिमत्व त्यातून सापडत नाही आणि पुरुषी बळजबरीच्या जुलमी व्यवहारात स्त्रियांचेही स्वत्व लयास जाते. प्रचंड निरोशेची काळीकुट्ट सावली सर्वदूर पसरते. रात्र अंधारी होते आणि दिवस उगवतच नाही. अश्लीलतेची रात्र तिच्या सार्या लंगड्या प्रयोजनासकट भयाण भासते. हा अंधार नष्ट करायचा तर शरीर-मनाचा सांधा जोडून घ्यावा लागणार आहे.
या उलट, फारकतीनंतर शरीरास त्याज्य, वर्ज, विटाळलेले मानून केवळ मनात गोंजारणारी अशरीर प्रेमाची Plationic Love -कल्पना कित्येक स्त्रियांमध्ये आढळते. शरीर प्रेमाची परिणती भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये पुनरुत्पादनात व्हावी अशी निसर्ग रचना आहे. मूल होणे, ते वाढवणे यासाठी सामाजिक चौकटीतील मान्यता असल्यास पुढील सोपस्कार आनंददायी, अन्यथा क्लेशकारक ठरतात हा आजचा सर्वसामान्य अनुभव आहे. ही क्लेशकारकता टाळण्यासाठी शरीर नाकारून प्रेमाची संकल्पना उभारली गेली आहे. सामाजिक चौकट टिकवण्यासाठी प्रेमाचे अशरीर प्रेमाचे मानवी संस्कृतीच्या इतिहासातून टप्प्याटप्प्यावर गोडवे गायलेले आढळतात. राधा-कृष्ण, मीरा-कृष्ण, असफल प्रेमिकांची बलिदाने, अशा अनेक गोष्टींतून या प्रेमाचे महत्त्व ठसविले गेलेले असते. “तुम्ही ओरबाडून शरीरसुख घेतले. मनाची कदर कधी केलीत? तुमच्या वासनेने शरीर विटाळून टाकलेत. शिसारी येते माझी आणि तुमचीही तक्रार करणाऱ्या स्त्रिया काही कमी आढळत नाहीत. ‘मधुराभक्ती’ अथवा ‘प्लॅटोनिक लव्ह’ ही देखील इतिहासाने गोंजारलेली विकृतीच आहे.
स्त्री-पुरुष एकत्र येताना या दोन भिन्न विकृती सोबत घेऊन येतात. मग सुसंवाद घडावा कसा? फार तर परस्परांचा वापर करून घेतला जातो आणि वापर करून घेऊ दिलाही जातो. नवऱ्याने पत्नीस आर्थिक स्थैर्य, सामाजिक मान मिळवून द्यावा; तिच्या आई-वडिलांना लग्नाच्या ओझ्याच्या जोखडातून मुक्त करावे आणि त्या बदल्यात तिने त्याला शरीरसुख द्यावे असा जणू अलिखित करार उरतो. येथे प्रेम आलेच कुठे? प्रेम नसेल तर ‘परस्परास प्रेमवर्षावात सुंदर करता करता स्वतःही सुंदर व्हावे’ हे स्वप्न मुळातच विरते. नाही म्हणायला, कधी चुकून-माकून सूर लागले आणि जुळले तर त्या अनामिक सौंदर्याची झलक स्पर्शून जाते. अपवादात्मक क्षणीच काय दे शरीर-मनाचे द्वैत विरघळून जाते. अन्यथा परस्परांचा वापर करून घेता घेता नाईलाजाने दिवसामागून दिवस आयुष्य रेटली जाते. मुलेबाळे होतात, वाढतात- वाढवली जातात, केस पिकतात, निवृत्ती येते तरी दोन व्यक्तींमधील भिंत अभेद्यच असते. लैंगिकतेसाठी परस्परांची गरज असूनही ‘मला तुझी गरज नाही’च्या इशार्यांची नौबत झडतच असते. या सार्वत्रिक परिस्थितीत अश्लील वांग्मय फोफावले नाही तरच आश्चर्य!
पूर्वी गावावस्त्यातून, वर्तमानपत्रेदेखील नसायची, रेडिओ क्वचितच आढळायचा. तेथेही विकृती होतीच. आता महानगरांतून अनेक वृत्तपत्रे, मासिके, घरोघरी टी.व्ही., व्ही. सी., आर.,केबल टी.व्ही. अशा सुविधा आहेत. या माध्यमातून अश्लीलतेची विकृती व्यक्त होत असल्याने तिचा आवाका फार मोठ्या प्रमाणावर दिसतो. फरक आहे तो एवढाच. वैज्ञानिक माहिती, पाश्चात्य देशांप्रमाणे स्त्री-पुरुषांचे मोकळे संबंध, प्रचार आणि प्रसार माध्यमे या सर्व गोष्टी वरवरचे आहेत. मन-शरीराचे अद्वैत आणि परस्पर आदर-प्रेम यावर आधारित स्त्री-पुरुष नात्यांचा अभाव अश्लीलतेच्या गाभ्याशी आहे. दुसऱ्या व्यक्तीचा वापर केला जाणे अथवा जाणून बुजून करणे ही सामाजिक विकृती सर्वदूर एक निराशेचे सावट पसरवीत आहे. एक काळोख सामाजिक जीवन व्यापून राहिला आहे. जोडीला हर एक क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा आणि अनंत विकृती आहेतच. या काळोख्या सावलीचे आणखीन एक प्रतिबिंब सामाजिक पातळीवर चालणाऱ्या छेडछाडीपासून ते बलात्कार आणि दुसऱ्या बाजूस हुल्लडबाजी ते गुंडगिरी या माध्यमातून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यात होते आहे. ही विकृत ‘मर्दुमकी’ जेव्हा बेकारीच्या हातात हात घालून येते, तेव्हा फॅसिझमचा उदय होतोय याची खूणगाठ मनाशी जरूर बांधावी.
पुरुषांची शरीरप्रेमाची विकृती आणि स्त्रियांच्या बाजूने अशरीर प्रेमाची विकृती एकत्र नांदताना कमालीचा अविश्वास उद्भवतो. स्त्रीने शरीर-प्रेमास रुकार दिला, तर पुरुष सदैव तत्पर असल्याच्या ‘स्वानुभवातून’ एक सर्वसाधारणीकरण होते. ‘पुरुषांची जात’ हा अर्थभारित शब्द तयार होतो. केवळ लग्नाच्या किंवा सामाजिक बंधनांमुळे अशरीर प्रेमाचे गोडवे गाणारी स्त्री त्या विकृतीतून बाहेर आली, तर तिचे दुसऱ्या कोणावरही प्रेम असू शकेल ही भीती, त्यापोटी आलेली संशयग्रस्त दृष्टी आणि हेवा-मत्सर हेवा स्त्री आणि पुरुषांमध्ये उद्भवतात. त्यांचा परिणाम स्त्रियांतील-प्रेमाची विकृती चलती ठेवण्यातच होतो. स्त्री-पुरुषांच्या वृत्तीमधील हा विरोधाभास इतका रूजला आहे, की तो निसर्गदत्तच वाटावा, आणि नाईलाजाने नियती म्हणून स्वीकारावा असा झाला आहे.
या परिस्थितीत घरकाम, चित्रकला, संगीत, साहित्य, अध्यात्म, जणू सार्या कृती ढालीसारख्या वापरल्या जाऊ शकतात. अशरीर-प्रेमाची आस असलेल्या स्त्रीने शरीर-प्रेमाला नकार देण्याऐवजी वरीलपैकी काही गोष्टीत व्यग्र असावे, तर पुरुषाने नकार स्वीकारण्याऐवजी स्वतःस वरील गोष्टीत गुंतवून ठेवावे अथवा करिअर करावे असे विचित्र व्यवहार घडतात. जीवन अर्थपूर्ण करू शकणार्या अशा कितीतरी सुंदर गोष्टींची स्वसंरक्षणासाठी तकलादू ढाल होते.
परस्परांना सरळ भिडताना या ढालींचा दुस्वास वाटणे सहज शक्य आहे. खरे म्हणजे हा राग दुसऱ्या व्यक्तीचा आहे हे भान हरपून क्र्न्व्हा , तबला, पुस्तके त्यांचाच राग वाढतो.
वास्तविक पाहता, शरीर-मनाची एकतानता हेच जिवंतपणाचं लक्षण आहे. मनाच्या समाधानासाठी शरीर हे केवळ साधन किंवा शरीर-तृप्ती पूर्णत्वापर्यंत नेण्यास पोषक घटक म्हणजे मन असे देखील शरीर-मनाचे नाते नाही. प्रिय व्यक्तीला डोळे भरून पाहताना मनच तर पाहत असते, स्पर्श केवळ हातांचाच नसतो, योनीच तेवढी प्रेमार्द किंवा लिंगच तेवढे ताररून येत नसते. शरीर आहे, त्यातील सर्व अवयव आहेत, ते जिवंत आहेत म्हणजेच तेथे मन आहे. नाही तर शरीरा प्रेत आहे! शरीराबाहेर कोठे व्यक्तीचे मन असते? जीवंत मानखेरीज शरीर म्हणजे जाळण्या-पुरण्याची किंवा गिधाडांना घालायची गोष्ट. शरीर-मनाची एकतानताच माणसाला सुंदर बनविते. अशी सुंदर व्यक्ति अशाच सुंदर व्यक्तीच्या सान्निध्यात येण्याने दोन्ही सुंदरता झळाळून येतात. प्रेम प्रेम म्हणजे तरी दुसरे काय ? माणसातील विकृती काढून त्याला सुंदर बनवणारी ही किमया आहे. ही किमया साधली ती व्यक्ती धन्य झाली. अन्यांसाठी मग आहेतच करिअर, पैसा, साहित्य, संगीत, चित्रकला, अध्यात्म इत्यादी ढाली, किंवा जीवन अंधारून टाकणारी अश्लीलता.
अश्लील साहित्याचा संबंध असे प्रेम दुर्मिळ असण्याशी, मन-शरीर एकतानता न साधण्याशी आहे. व्यक्तिगत आयुष्यात ही एकतानता साधूनच अश्लील साहित्याची गरज नष्ट करता येऊ शकते. परंतु सामाजिक पातळीवर मात्र अश्लील साहित्याची हकालपट्टी करून एकतानता साधण्यास पोषक वातावरण तयार होऊ शकते. या दृष्टीने काही कार्यक्रम हाती घेताना शृंगार, लैंगिक कल्पनाविश्वांचे खेळ आणि अश्लीलता यांच्या सीमारेषांबाबत मतभेद जरूर होणार. परंतु, या सीमारेषा पार करून निबिड अंधारात नेणारे हिंसात्मक अश्लील साहित्य आज मोठ्या वेगाने फोफावते आहे.केवळ स्त्रीच्याच नव्हे तर पुरुषांच्याही प्रतिमेस विकृतींचे खाद्य पुरवणार्या अशा साहित्यावर परिणामकारक बंदी घालण्याची मागणी आज जरूर मूळ धरू शकेल. ती समाजजीवन सुंदर करण्याच्या आपल्या प्रयत्नांची आजची दिशा आहे. बाकी संधीप्रकाशातील विषयासंबंधी चर्चा होऊ शकतात आणि मतभेद देखील. या साऱ्या रामरगाड्यात व्यग्र असून देखील प्रत्येकाने स्वतःच्या अनुभवांकडे पुन्हा पुन्हा वळून पाहिले पाहिजे. तसे पाहताना भाषा नव्याने घडवली पाहिजे. शृंगारसाहित्याची निर्मिती झाली पाहिजे.
अर्थाने विटाळलेले शब्द शुद्ध करावेत !
शरीर-मनाच्या फारकतीवर आपले सारे व्यवहार. त्या व्यवहारातून घडलेली आणि घडत असलेली भाषा आणि आधी म्हटल्याप्रमाणे शृंगारिक साहित्याची-कलांची गरज या तीन्हीची सांगड व्यवस्थितपणे बसणे अवघड झाले आहे. शब्दांना व्यवहारातील वापरातून अर्थ प्राप्त होतात, हे सत्य स्वीकारणे तर क्रमप्राप्त आहे त्यामुळेच, अशा साहित्यात शब्द कोणते वापरायचे, अर्थवाही शब्द कुठून आणायचे, नवीन कसे घडवायचे, जुने अनर्थकारी शब्द कसे शुद्ध करायचे हे प्रश्न उभे ठाकतात.
शरीर-मनाच्या फारकतीमधून शृंगार, अश्लीलता, बीभत्सता यातील सीमारेषा पुसट झाल्या आहेत. अशरीर-प्रेमाची संकल्पना सोडून दिल्यावर उत्तम शृंगारिक साहित्यात प्रेमळ शरीर अवयवांना शब्द लागणार. मराठीतील शब्द या संदर्भात आठवून पहावेत. त्यांचे अर्थ अनर्थकारी असल्याचे सहज जाणवेल. मग पर्याय म्हणून संस्कृत भाषेतील शब्दांची इंग्रजी शब्दांची उसनवारी सध्या तरी अपरिहार्य ठरते आहे. लिंग, योनी, संभोग, नितंब, वक्ष, स्तन हे शब्द संस्कृत आहे. त्यांना रूढ पर्यायी मराठी शब्द अर्थाने विटाळालेले आहेत. त्यांचा वापर होताच संभोगातील स्त्री सहभागाचा अपमान जणू अटळ होतो. शिव्यांचा वापर करून सहभोगातील आनंदाची जागा आपण वर्चस्व-कनिष्ठत्वाला, दादागिरीला, स्त्री रक्षण करण्याच्या अक्षमतेला बहाल केली आहे.
‘चाराअक्षरी’ इंग्रजी शब्दांचे वर्णन देखील ‘हलकट’ या विशेषणाखेरीज पूर्ण न होणारे आहे. मग इंग्रजीतून शब्द घेताना तांत्रिक पारिभाषिक शब्द उचलायचे. हे शब्द तर मृत शरिराच्या अवयवासदेखील लागू पडणारे. त्यांना अर्थाचा पांडुरोग झालेला. शरीर-मन फारकतीचे बळी ठरलेले हे शब्द शृंगारिक साहित्यात वापरायचे कसे?
उत्तम साहित्यासाठी अर्थाने पुष्ट आणि निरोगी शब्दांची नितांत गरज आहे. ‘अमृताते पैजा जिंकू’ पाहणार्या मायबोली मराठीवर प्रेम असलेल्यांना हे एक आव्हान आहे. विविध वयाच्या मुला-मुलींसाठी, स्त्री-पुरुषांसाठी शृंगाराची गरज आहे. नव रसांचा शृंगाररस ‘राजा’ आहे असे केवळ म्हणून भागणार नाही. व्यवहारातून ते वारंवार सिद्ध व्हावे लागेल
हे आव्हान पेलायचे तर नवे शब्द घडवणे, जुने योग्य वापराने शुद्ध करणे ओघानेच आले. अज्ञानावर आधारित मासिक पाळीचा विटाळ, जातीयतेच्या अमानुषतेवर आधारित विटाळ हे जसे त्याज्य आहेत, अगदी त्याचप्रमाणे अश्लीलतेवर आधारित शब्दांना झालेले अर्थांचे विटाळ देखील त्याज्य आहेत. हे आव्हान पेलताना आपण केवळ भाषाच नाही तर स्वतःलाही सुसंस्कृत बनवून सौंदर्याची झळाळी देणार आहोत.
प्रिय व्यक्तीला सुंदर करता करता स्वतःलाही त्या लखलखत्या प्रेमाच्या विद्युत प्रकाशात सुंदर करण्यासाठी आणि ते न जमल्यास जगताना येणाऱ्या कुरूपतेला हळुवारपणे दूर करण्यासाठी ना ? मला तरी असेच वाटते. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी काही तुमच्यापेक्षा वेगळा नाही, म्हणून वाटते, तुमचेही मनोगत थोड्याफार फरकाने माझ्यासारखेच असावे. हा विषय एवढा नाजूक की, शब्दस्पर्श होताच आत निसटून खळळकन खाली पडून विर्दिण व्हावा. शब्दांच्या सौंदर्यावर ओरखडे उमटू द्यायचे नाहीत आणि शब्दांनीच धार वापरून अलगदपणे कुरूपता काढून टाकायची असे ठरवून कागदावर लेखणी टेकविली, अश्लीलतेची अंधारी रात्र जरी आपल्या वाट्याला आली तरी ते काळे ढग दूर व्हावेत, पुढील पिढीला निर्मळ प्रकाश दिसावा यासाठीच्या प्रयत्नांची दिशा शोधण्याचा हा केवळ एक नाममात्र प्रयत्न आहे. यात उणीवा असतील, अति महत्त्वाच्या गोष्टी कदाचित वगळल्या गेल्या असतील. शक्य आहे. परंतु आपण सार्यांनीच थोडा नेट लावला तर …
‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ असं म्हटले जाते. याचा साधा अर्थ म्हणजे कोणत्याही दोन व्यक्ती समान नाहीत. उत्तम शिल्पकाराला प्रत्येक पत्थराचे अंतरंग म्हणजे नवीन आव्हान असते. ते स्वीकारलं आणि पेललं म्हणजे नवीन कलाकृती घडते.जर शिल्पकाराचा पत्थर, चित्रकाराचा कॅनव्हास यातून नवीन कलाकृती घडू शकते, तर प्रत्येक मानवी आयुष्य कलाकृती का ठरू नये? जीवन जर कलाकृतीसारखे सुंदर व्हायचे तर प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे वैशिष्ट्य जपलं आणि फुलवलं पाहिजे. एका छापाच्या गणपतीप्रमाणे माणसे आणि त्यांचे परस्पर व्यवहार एका छापाचे होता कामा नयेत.
शृंगार आणि लैंगिकता यांच्या संदर्भात अश्लीलता आपणास एका साच्यातून काढते. प्रेम कोणावर करायचे, तर सिनेमा नट – नाटयांप्रमाणे “सुंदर असणाऱ्या” व्यक्तींवर, प्रेम कसे करायचे तर श्रीदेवी - अनिल कपूर (किंवा अशाच एका फिल्मी अथवा जाहिरातीतील जोडी.) यांच्यासारखे, शृंगार कसा करायचा, तर अनेक सौंदर्यप्रसाधने आणि जाहिरातीतील कपडे वापरून काश्मीर, अशा ठिकाणी धावाधाव करत शृंगार करायचा आणि लैंगिकता कशी व्यक्त करायची तर अश्लील वांगमया नुसार व्यक्त करायची. सारे साचे ठरून गेले आहे. आपण आपली सर्जकताच गमावून बसलो आहोत. मजनूच्या नजरेतून लैलाकडे पाहण्याची कुवत कुठे गेली? प्रेमातून दुसऱ्या व्यक्तीस सुंदर करण्याची क्षमता तयारच झाली नाही का? भस्मचर्चित, रुंडमाळा घालणारा बैरागी शिवशंकर पार्वतीस प्रिय आणि म्हणून सुंदर जाणवू शकतो. ती नजर का हरवली? शृंगारमय झालेली सूरदासांची राधा कृष्णाला म्हणते, “तू राधा हो. मी कृष्ण बनून तुझ्यासारखी बासरी वाजवेल.” शृंगाराचा हा पोत किती देखणा आहे! हे देखणेपण हाती यायच्या आधीच हरवलं? लैंगिकतेमध्ये तर स्त्रियांनी ‘ते किळसवाणे’ कृत्य कर्तव्य म्हणून करून घ्यायचे आणि पुरुषांनी मर्दुमकीचा विजय घोषात जेतेपण मिरवायचे. हा सर्वच प्रकार फार फार विकृत आहे. आपण त्यात आपलं माणूसपण हरवून बसतो.
विकृतीच्या अनेक तर्हा आहेत. मानवी लैंगिकतेशी संबंधित विकृती जोपासल्या जाण्याचं एक महत्त्वाचं कारण अश्लीलता आहे. ही कधी किळसवाण्या नागड्या स्वरूपात तर कधी ‘शास्त्रीय लैंगिक ज्ञान’ देण्याच्या बुरख्या आडून आणि ‘स्वातंत्र्य, कला - कल्पनाविलास या नावाखाली सर्रास थैमान घालत, मानवी जीवनच अंधार्या रात्रीप्रमाणे काळवंडत आली आहे .या अंधारात स्वतःच्या इच्छा - आकांक्षा, लैंगिकता आणि शृंगारातील स्वतःचे वेगळेपण, समाधानाचा सूर काही म्हणता काही हाती लागत नाही. एक घोर निराशा एकारत जीवन व्यापून टाकते.
अश्लीलता मैत्रीतल्या भिंतीचित्रातून, अक्षर वांग्मयतून, चित्रपट - व्हिडिओ पार्लर्समधून, काही विदेशी फोटो मासिकांतून जशी प्रगटते तशीच ती ‘पुरुषी’ विनोदातून , शिव्यांतून, रस्त्याने जाताना दिल्या जाणाऱ्या धडकांतून, अनोळखींच्या वक्षांवरून फिरणाऱ्या ओशाळवाण्या ‘सभ्य नजरांतून’ जीवनात वावरते.
ग्रामीण - शहरी भाग, उच्चभ्रू कनिष्ठ स्तर, लहान - मोठे, विकसित - अविकसित देशातील समाज या साऱ्या भेदांना व्यापून अश्लीलता दशांगुळे उरलीच आहे. ‘ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ’ शोधणं जसं जिकिरीच असतं तसंच अश्लीलतेचा मानवी इतिहासातील उगम शोधणं देखील कष्टप्रद आहे. परंतु, अश्लीलतेचं आजचं प्रयोजन पाहणं, तिची व्याख्या करण्याचा प्रयत्न करणं तुलनेनं सोपं आहे. या प्रयत्नातून अश्लीलतेची अंधारी रात्र नष्ट करनं कदाचित शक्य होईल म्हणून हा खटाटोप!
अश्लीलता अशी रुजते!
प्राण्यांप्रमाणे मानवी प्रणयाराधन काही निसर्ग चेतनातून होत नाही. विशिष्ट ऋतू ‘माजावर’ येण्याचा काळ, ‘गंध’ या चेतना मानवी विकासक्रमात जवळपास लोकल्यागत आहेत. त्यांची जागा इच्छा, सामाजिक संकेत, अपेक्षा या माध्यमातून होणाऱ्या साद-प्रतिसादांनी घेतली आहे. वय वाढताना या सार्या गोष्टींचे मिश्रण मानवी मनात आकारत असते. त्यातून मानवी मनाची जडणघडण होतानाच प्रकृती विकृतींचा हातभार लागतो. अश्लीलतेची विकृती कळत-नकळत वय वाढता – वाढता आपला भाग बनते. तिचे व्यसन देखील जडते. अश्लीलतेचा संबंध प्रामुख्याने पुरुषी भावविश्वाशी आहे असे मला तरी अश्लीलतेच्या आशया (Content) वरून वाटते. पुरुषांसाठी प्रामुख्याने तयार झालेल्या अश्लीलतेचा ‘आस्वाद’ स्त्रियाही घेत असतील, नाही असे नाही. परंतु, माझ्या आजूबाजूस तरी असे प्रमाण अत्यल्प दिसले आहे. खूप वेळेला सोबतच्या पुरुषाच्या (प्रियकर, पती या स्वरूपातील) इच्छेखातर हा ‘आस्वाद’ घेतला जातो.
‘मी तेवढा सभ्य’ अशी प्रौढी कुणी पुरुषाने मिरवू नये अशी स्थिती आहे. स्वतःचा भूतकाळ त्रयस्थपणे मनाच्या आरशात पाहण्याचा प्रयत्न केला की अनेक गोष्टींची उकल आपोआपच होईल. ७ ते १० वर्षांपर्यंत अनेक शिव्या आत्मसात होतात. ‘स्त्रियांचा रक्षणकर्ता’ या बिरुदास शिव्यांच्या सहाय्याने नालायक ठरवून स्वतःची मर्दानगी शाबीत करण्याची प्रक्रिया याच काळात आकरू लागते. १० ते १५ वर्षांपर्यंत केव्हा तरी लैंगिकतेचा अर्थ कळू लागतो. संध्याकाळी अंधार पडायला लागल्यावर ‘चावट’ विनोदांच्या झडणाऱ्या फैरी, शाळांच्या मूत्र्यांतील भिंतीवरील ‘कलाकृती आणि साहित्य’ लिहिले - वाचले जाणे, मुलींच्याबद्दल वाढते आकर्षण आणि स्वतःच्याच तोर्यात मिरवत जाणाऱ्या मुलींबद्दल राग-द्वेष -असूया, मुलींप्रमाणे सौंदर्य-प्रसाधने वापरण्याची इच्छा, पण आज येणारे संकेत, भीत-भीत टाकलेले कमेंट या गोष्टी प्रस्तुत वयात घडू लागतात. १५ ते २० दरम्यान मिसरूड फुटू लागलेले, शैक्षणिक अथवा आर्थिक आणि शारीरिक भरदारपणा यांचा, मुलींवर छाप पडण्यासाठी हत्यार म्हणून, वापर करण्याची मनीषा, अश्लील वांग्मय चोरून पाहणे- वाचणे पाहणे, दुसऱ्यावर बळजबरी करण्याची तीव्र होणारी भावना यांना मित्रकंपूमधून मिळणारे प्रोत्साहन, ‘ओरबाडून घ्यायचा प्रतिसाद’ हे ‘पुरुषी लक्षण’ अशा गोष्टी या वयात मनात रुजू लागतात. पुढे त्यांचे व्यसन जडते. सभ्यतेची झूल आतील असभ्यता फाडत असते. एक केविलवाणी दुतोंडी धडपड चालू राहते. हे व्यसन वयाच्या कोणत्याही टप्प्यावर साथ देऊ शकते. मानवी लैंगिकतेचे साचे एका छापातून आपल्याला घडवत जातात. ‘तेथे दिसलं पाहिलं’ ते समाधान अशी लैंगिक समाधानाची व्याख्या घडते. अतिमानवी अपेक्षा भक्कम बनून जन्मभर असमाधानाचा सूर धरतात. ओरबाडून सुख घेण्याचे प्रसंगी त्यासाठी बाळाचा अथवा हिंसेचा वापर करण्याचे बाळकडू याच २० ते २५ वयापर्यंत मिळत असते. या कालपटावर प्रत्येकाने स्वतःला जरूर निरखून - पारखून घ्यावे.
अश्लीलतेचे प्रयोजन
विविध माध्यमांतून आणि जीवनाच्या काही अंगातून अश्लीलता पुन्हा पुन्हा का प्रकटत राहिली आहे, हा एक क्लिष्ट प्रश्न आहे. अश्लीलतेच्या वातावरणात वाढताना चोरटेपणा, अपराधीपणा, कोडगेपणा, हिंस्त्रता या जीवन कुरूप करणाऱ्या करणाऱ्या भावना कमी अधिक प्रमाणात मनात घर करतात हा सार्वत्रिक अनुभव आहे, या भावनांशी साहचर्य काही सुखाचे ठरत नाही. तरी प्रत्येक पिढी जवळपास अश्लिलतामिश्रित वातावरणात वाढली आहे आणि वाढते आहे. स्त्री मुक्ती विचार पटलेल्या, आचरणात आणू पाहणार्या स्त्रियांनादेखील स्वतःच्या वाढत्या वयातील मुलांशी या संबंधात कसा संवाद साधायचा हा प्रश्न पडतो.
सध्या माध्यमे वाढली आहेत, त्यांचे व्यापारीकरण झाले आहे, ‘जे खपते ते विकते’ या तत्वानुसार अश्लीलता फोफावते आहे असे स्पष्टीकरण विस्ताराने देता येईल; त्याविरुद्ध कायद्याने परिणामकारक बंदी असण्याची भाषा करता येईल. कदाचित तशी बंदी आणताही येईल. परंतु, त्यामुळे अश्लीलता नष्ट होईल हा भ्रम आहे. कारण, जेव्हा या माध्यमांचा सुकाळ नव्हता, तेव्हाही अश्लिलता होतीच की! वेश्याव्यवसाय तर इतिहासातील सर्वात पुरातन व्यवसाय म्हणविला जातो. त्यासोबत अश्लीलता होतील, आजही आहे. तेव्हा प्रसिद्धी माध्यमे हे काही अश्लीलतेचे कारण नाही. ते तर केवळ अश्लीलता प्रसाराचे माध्यम आहे. या विकृतीचेही काही प्रयोजन असले पाहिजे. त्याचा छडा लागणे महत्त्वाचे आहे.
आधी म्हटल्याप्रमाणे मानवी लैंगिकता इतर प्राण्यांप्रमाणे निसर्ग – चेतनांवर फारशी अवलंबून नसल्याने, प्रत्येक पिढीस ती बाहेरून म्हणजे आजूबाजूच्या समाजातून आत्मसात करावी लागते. अश्लीलतेचे हे एक प्रयोजन सांगितले जाते. मानवी लैंगिकतेमध्ये शरीरशास्त्रीय कुतूहल आहे. वास्तविक हे कुतूहल शरीरशास्त्राच्या अभ्यासातून शमवले जाऊ शकते. परंतु जेथे डॉक्टर घडतात त्या विद्यार्थी-वसतिगृहातून अश्लीलसाहित्याचा सुकाळ पाहता शरीरशास्त्रीय माहिती, लैंगिक शिक्षण या गोष्टी दुय्यम महत्त्वाच्या म्हणाव्या लागतील. या दुय्यम महत्त्वाच्या गोष्टींवर देखील भरपूर वाद होतात. शाळांतून लैंगिक शिक्षण दिल्यास ‘व्यभिचार वाढेल अशी ओरड अधून-मधून ऐकू येतेच. अश्लीलतेच्या चोरट्या आणि अशास्त्रीय मार्गापेक्षा सरळपणे शास्त्रीय पायावर आधारित असे लैंगिक शिक्षण ७ वी ते १० पर्यंत दिले जाणे आवश्यक आहे. केवळ शाळांतून नव्हे तर घरी पालकांमार्फतदेखील मुला-मुलींच्या या विषयातील प्रश्नांचे समाधान झाले पाहिजे. विषय नाजूक आहेत. तो जबाबदारीने शिकविला जाणे महत्वाचा आहे. या स्थितीत पालकांनी बेफिकीर राहणे बेजबाबदारपणाचे ठरेल . हे घडावे म्हणून प्रयत्न करणे महत्त्वाचे आहेत. परंतु लैंगिक शिक्षण दिल्याने अश्लीलतेचा प्रश्न सुटेल असा भ्रम बाळगला जाऊ नये.
भारतीय समाजात स्त्री - पुरुषांनी विविध वयात एकत्र येणे दुरापास्त ठरते. सामाजिक संकेतांचा काच एवढा प्रचंड आहे, की एकत्र वाढताना इतर अनेक विषयांसोबत लैंगिकतेचे, शृंगाराचे आणि प्रणयाराधनाचे घडे आपसूक मिळणे अशक्य आहे, तेवढी मोकळीक नाही. त्यामुळे अश्लीलता बोकाळते किंवा ही पोकळी अश्लीलता भरून काढते असा दुसरा युक्तिवाद पुढे केला जातो. परंतु, यात देखील फारसे तथ्य नाही हे पाश्चात्य जगाकडे दृष्टिक्षेप टाकल्यास स्पष्ट होईल. युरोप-अमेरिकेत हे स्वातंत्र्य जास्त मोठ्या प्रमाणावर आहे. शालेय शिक्षण पूर्ण होण्याआधीच मुले-मुली मोठ्या प्रमाणावर एकत्र येतात. त्यातून निर्माण होणाऱ्या किशोरवयीन मातांचे आणि अपत्यांचे प्रश्न माणुसकीच्या भावनेतून सोडवण्याचे प्रयत्न कौतुकास्पद असले तरी फारच अपुरे आहेत. शिवाय अशा माता आणि बेवारशी अपत्यांच्या उध्वस्त होणाऱ्या मानसिकतेचे काळजी घेतली जात असेल हा प्रश्नच आहे. हे सारे प्रश्न असले तरी तेथे स्वातंत्र्य जास्त असल्याचे आपणास मान्य करावे लागेल. या स्वातंत्र्याने अश्लीलतेला लगाम घातल्याचे तेथे दिसत नाही. उलट, सौम्य आणि हार्ड पोर्नोग्राफीचे आगार म्हणजे युरोप-अमेरिका असे समीकरण रूढ झाले आहे. अत्यंत बाजारूवृत्ती, जे खपेल ते विकावे; शस्त्रास्त्रे विकून, युद्धांचा वणवा पेटता ठेवून, चरस -अफू -गांजा –एल एस डी अथवा अश्लीलता विकून झटपट पैसा करावा ही नफेखोर वृत्ती तेथे आहे. मानवी नाती आणि परस्परांबद्दल आदर ही मानवी मुल्ये नफेखोरी हरवली आहेत. नव्या पिढीत मुला मुलींचे संबंध स्नेहार्द्र असणे अशक्यप्राय झाले आहे. अश्लीलता वाढली नाही तरच आश्चर्य वाटावे, अशी तेथे परिस्थिती आहे. हे नफेखोर वातावरण मुला-मुलींना जास्त स्वातंत्र्य मिळावे असे प्रयत्न झाले पाहिजेत. त्यातून व्यक्तीविकास साधला गेला पाहिजे. सामाजिक संकेतांचा काच दिला झाला पाहिजे. अपघाताने, अंदाज चुकले, पाऊल घसरले तरी त्या व्यक्ती कोलमडून न देता पुन्हा मानसिक उभारी मिळाली पाहिजे. यासाठी पालकांची शिक्षणसंस्थांची आणि इतर सामाजिक संस्थांची मानसिकता नव्याने समजूतदार पायावर घडवली गेली पाहिजे.
अश्लीलता नष्ट व्हायची तर परस्पर आदरातून मानवी लैंगिकता व्यक्त होणे महत्वाचे आहे. या संदर्भात विविध कलाकृतींचा मोठा सहभाग असू शकतो. सूरदासांची राधा, मीरेचा कृष्ण, जनीचा विठू या काव्यातून भक्तीच्या आवरणात शृंगार आहे. शृंगाराचा विटाळ मानायचे कारण नाही. खजुराहो आणि सूर्यमंदिरातील मैथुन-शिल्पांच्या एकंदरीत मांडणीतून शृंगार आहे. ‘मालवून टाक दीप’ अथवा ‘समईच्या शुभ्र कळ्या’ या काव्यातील भट आणि आरती प्रभू यांनी व्यक्त केलेला शृंगार सुंदर आहे. स्त्री-पुरुष संबंधांची, त्यातील सौंर्द्याची आणि विकृतींमुळे आलेल्या कुरूपतेला बाजूला काढू पाहणारी अभिव्यक्ती सामाजिक जीवन जास्त सुसंस्कृत करत असते. चांगले शृंगारिक साहित्य ही देखील समाजाची गरज आहे. शृंगाराला नाके मुरडायची आणि अश्लीलता चोरटेपणे जपायची ही दांभिकता सोडण्याची गरज फार प्रकर्षाने जाणवते. शृंगारिक साहित्याच्या अभावाची भरून काढणे हे अश्लीलतेचे एक प्रयोजन म्हणून पुढे केले जाते. उत्तम दर्जाच्या शृंगार-साहित्याच्या निर्मितीमध्ये रूढ भाषेची अडचण आहे . तिच्या ओघात पुढे विचार करायचा आहे.
शृंगार आणि अश्लीलतेमधील फरक
अश्लीलता म्हणजे नेमके काय, या प्रश्नाचे उत्तर न देता, सर्वसाधारणपणे अश्लीलतेच्या मान्य आत्तापर्यंत आपण चर्चा केली. कलाकृतींची चर्चा करताना श्लील-अश्लील यांच्या भेदावरून वारंवार काथ्याकूट केला जातो. कधी कधी तर कोर्ट केसेस झालेल्या आहेत. चि. त्यं. खानोलकरांचे ‘अवध्य’ हे नाटक अश्लील आहे. म्हणून ओरड झाली होती, ‘बलात्कार कसा करतात’ ही अनिल थत्तेंची पुस्तिका अश्लील नाही असे तिचे पुरस्कर्ते म्हणतात. हा विरोधाभास पाहता गरगरायला होते.
प्रेम, शृंगार, प्रणयाराधन, मैथुन यांचे मानवी जीवनातील स्थान सौंदर्यपूर्ण असू शकते, नव्हे ते तसे असावे अशा आग्रहापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. प्रेम शृंगार-प्रणयाराधन-मैथुन यांसाठी “लैंगिकता” हा शब्द यापुढे आपण सोयीसाठी वापरूया. मानवी जीवनाचा लैंगिकता हा अविभाज्य आणि अर्थपूर्ण भाग असला तरी लैंगिकता म्हणजे संपूर्ण मानवी जीवन नव्हे ही खूणगांठ देखील पक्की पाहिजे. जी लैंगिकता मानवी व्यक्तिमत्त्वाचा भाग बनून येते, जी मध्ये व्यक्ती वैशिष्ट्ये पुसली जात नाहीत, जी परस्परांत सादप्रतिसाद घालत फुलाप्रमाणे उमलत राहते त्या लैंगिकतेमध्ये अश्लीलता नाही असे सरळ म्हणावे.
हे जरा उदाहरणाने स्पष्ट करून पाहू. सकाळ ते रात्र एकत्र असणारी जोडपी दिवसभरात घरकाम, वाचन, एकत्र नाटक-सिनेमा, व्यवसाय यात गर्क असतात. चहा घेता घेता चार सुखदुःखाच्या गप्पा मारतात. उदाहरणादाखल घेतलेला दिवस हाच काही त्यांच्या जीवनाचा एकमात्र दिवस नसतो. त्याला भूतकाळ आणि उद्याची स्वप्ने असतात. त्यात कितीतरी भावनिक देवाणघेवाण असते. याचाच भाग म्हणून त्यांचा शृंगार असतो, मैथुन असते. ही लैंगिकता त्या जोडप्याचे जीवन जास्त अर्थपूर्णपणे फुलावीत असते. सुंदर करीत असते. कल्पना करा की, केवळ या मैथुनाची चित्र-फीत तयार केली आहे. ती फीत पाहताना जीवनाची बाकी अंगे चित्रीत न झाल्याने दिसत नाहीत. येथे मैथुन हे जणू संपूर्ण जीवन म्हणून समोर येते. ही चित्र-फीत अश्लील ठरते. परंतु, जर उत्तम दिग्दर्शकाच्या हातून या जोडप्याचे सहजीवन, त्यातील सुखदुःखे, ताण-तणाव हे सारे घेऊन एखाद्या चित्रपट आला, मैथुनातून जी प्रेमाची देवाण-घेवाण होते ती केंद्रस्थानी ठेवून त्या संदर्भात आवश्यक तेवढा शृंगारा आला, तर तो चित्रपट उत्तम कलाकृती होऊ शकतो.
मानवी व्यवहारातील व्यामिश्रता, गुंतागुंत, देवाण-घेवाण टाळून त्यांना केवळ शारीरिक पातळीवर आणण्यात आहे. अश्लीलतेची पुढची पायरी मानवी व्यवहार केवळ शारीरिकच नव्हे तर लिंग-योनी, मांड्या, स्तन, कुल्ले अशा शरीर अवयवांच्या पातळीवर गोठविणे ही आहे. मानसिकता नाकरत, मैथुनाची निगडित नसलेल्या बाकी शरीर नाकारत जाताना आपण केवळ स्वतःलाच नकार देत नसतो तर इतर व्यक्तींना नाकारतो. दुसऱ्या व्यक्तीचे शरीर म्हणजे स्वतःच्या शरीराचा एक विधी उरकण्याचे साधन ठरते. त्यातून बळजबरी, शरीरबळाचा स्त्रीविरुद्ध वापर, हिंसाचार यांचा जन्म होतो. ही अश्लीलतेची आजची सर्वात वरची पायरी आहे. हार्ड पोर्नोग्राफी, ट्रिपल एक्स ही तिची लेबले आहेत. दुसऱ्याला फुलवत स्वतः फुलण्याची किमया करंटेपणाने टाळून, स्वतःला नाकारून दुसर्याला नाकारण्याचा आणि त्यातून विजेत्या योद्ध्यांचा उन्माद मिरवित अश्लीलता सारे जीवनच अर्थहीन बनवते. पुरुषांना स्वतःचे व्यक्तिमत्व त्यातून सापडत नाही आणि पुरुषी बळजबरीच्या जुलमी व्यवहारात स्त्रियांचेही स्वत्व लयास जाते. प्रचंड निरोशेची काळीकुट्ट सावली सर्वदूर पसरते. रात्र अंधारी होते आणि दिवस उगवतच नाही. अश्लीलतेची रात्र तिच्या सार्या लंगड्या प्रयोजनासकट भयाण भासते. हा अंधार नष्ट करायचा तर शरीर-मनाचा सांधा जोडून घ्यावा लागणार आहे.
शरीर-मनाची फारकत
मानवी शरीर आणि मन यांच्या गुंतागुंतीच्या संबंधातून मानवी व्यक्तित्व साकारते. या व्यक्तिमत्वामध्येच ‘स्व’ ची जाणीव आणि अभिव्यक्ती गृहीत असते. ही ‘स्व’ ची जाणीव आणि अभिव्यक्ती जेवढी प्रगल्भ व सुसंस्कृत तेवढे तिचे व्यवहार म्हणजे व्यक्ती -व्यक्तीमधील संबंध सुसंस्कृत ठरतात. मानवी संस्कृतीत वरील प्रकारे पायाभूत असणारी शरीर-मनाच्या संबंधातील गुंतागुंत अथवा व्यामिश्रता समजावून घेतानाच प्रकृती आणि विकृतींचे ज्ञान होणार आहे. आपल्या जडण-घडणीत शरीर-मनाची फारकत झाल्याचे वारंवार जाणवते. या फारकतीचा एक परिणाम अश्लीलतेमध्ये आपल्याला आढळतो तर दुसरा परिणाम शरीर नाकारण्याकडे होतो. ही फारकत स्वीकारली की शरीर धर्मात प्राधान्य मिळते. अनेक पुरुषांच्या लैंगिकतेकडे पाहाण्याचा हाच विकृत दृष्टिकोन आढळतो. वासना या शरीर-वासना ठरतात. त्यांचे शमन अथवा दमन करण्याकडे प्रवृत्ती होते. शमन अथवा दमानातून वासना विसर्जित करण्याचा प्रयत्न फोल ठरतो. शमनासाठी अश्लील वांगमय आणि स्वतःचे अथवा दुसऱ्याचे शरीर चालते. तात्पुरते समाधान मिळाले तरी ते समाधान मानायला शरीरापासून वेगळे काढलेले मन तयार नसते. म्हणूनच समाधान मिळूनही न मिळाल्यासारखे होते. ‘जे समाधान हवे होते, ते हे नव्हे’ यातून सततची अतृप्ती निर्माण होते. पुन्हा पुन्हा त्याचा शोध सुरू राहतो. हात, लिंग, योनी, स्तन, मांड्या, छाती बदलून, ना स्वतःच्या मनाचे समाधान होते ना दुसऱ्याच्या मनाचे. शरीराच्या देखील विविध अवयवांचे मग भावनिक पातळीवर विच्छेदन होते. लैंगिकतेशी सरळपणे संबंधित अवयव केंद्रस्थानी उरतात. फारकत झालेले मन स्वतंत्रपणे मागण्या करू लागते. या मान्य होत नसतील तर बळजबरी उद्भवते. या बळजबरीची पुढची पायरी असते हिंसा-मानसिक आणि शारीरिक. अश्लील वादमय अथवा कृती या स्वरूपाची असते.या उलट, फारकतीनंतर शरीरास त्याज्य, वर्ज, विटाळलेले मानून केवळ मनात गोंजारणारी अशरीर प्रेमाची Plationic Love -कल्पना कित्येक स्त्रियांमध्ये आढळते. शरीर प्रेमाची परिणती भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये पुनरुत्पादनात व्हावी अशी निसर्ग रचना आहे. मूल होणे, ते वाढवणे यासाठी सामाजिक चौकटीतील मान्यता असल्यास पुढील सोपस्कार आनंददायी, अन्यथा क्लेशकारक ठरतात हा आजचा सर्वसामान्य अनुभव आहे. ही क्लेशकारकता टाळण्यासाठी शरीर नाकारून प्रेमाची संकल्पना उभारली गेली आहे. सामाजिक चौकट टिकवण्यासाठी प्रेमाचे अशरीर प्रेमाचे मानवी संस्कृतीच्या इतिहासातून टप्प्याटप्प्यावर गोडवे गायलेले आढळतात. राधा-कृष्ण, मीरा-कृष्ण, असफल प्रेमिकांची बलिदाने, अशा अनेक गोष्टींतून या प्रेमाचे महत्त्व ठसविले गेलेले असते. “तुम्ही ओरबाडून शरीरसुख घेतले. मनाची कदर कधी केलीत? तुमच्या वासनेने शरीर विटाळून टाकलेत. शिसारी येते माझी आणि तुमचीही तक्रार करणाऱ्या स्त्रिया काही कमी आढळत नाहीत. ‘मधुराभक्ती’ अथवा ‘प्लॅटोनिक लव्ह’ ही देखील इतिहासाने गोंजारलेली विकृतीच आहे.
स्त्री-पुरुष एकत्र येताना या दोन भिन्न विकृती सोबत घेऊन येतात. मग सुसंवाद घडावा कसा? फार तर परस्परांचा वापर करून घेतला जातो आणि वापर करून घेऊ दिलाही जातो. नवऱ्याने पत्नीस आर्थिक स्थैर्य, सामाजिक मान मिळवून द्यावा; तिच्या आई-वडिलांना लग्नाच्या ओझ्याच्या जोखडातून मुक्त करावे आणि त्या बदल्यात तिने त्याला शरीरसुख द्यावे असा जणू अलिखित करार उरतो. येथे प्रेम आलेच कुठे? प्रेम नसेल तर ‘परस्परास प्रेमवर्षावात सुंदर करता करता स्वतःही सुंदर व्हावे’ हे स्वप्न मुळातच विरते. नाही म्हणायला, कधी चुकून-माकून सूर लागले आणि जुळले तर त्या अनामिक सौंदर्याची झलक स्पर्शून जाते. अपवादात्मक क्षणीच काय दे शरीर-मनाचे द्वैत विरघळून जाते. अन्यथा परस्परांचा वापर करून घेता घेता नाईलाजाने दिवसामागून दिवस आयुष्य रेटली जाते. मुलेबाळे होतात, वाढतात- वाढवली जातात, केस पिकतात, निवृत्ती येते तरी दोन व्यक्तींमधील भिंत अभेद्यच असते. लैंगिकतेसाठी परस्परांची गरज असूनही ‘मला तुझी गरज नाही’च्या इशार्यांची नौबत झडतच असते. या सार्वत्रिक परिस्थितीत अश्लील वांग्मय फोफावले नाही तरच आश्चर्य!
पूर्वी गावावस्त्यातून, वर्तमानपत्रेदेखील नसायची, रेडिओ क्वचितच आढळायचा. तेथेही विकृती होतीच. आता महानगरांतून अनेक वृत्तपत्रे, मासिके, घरोघरी टी.व्ही., व्ही. सी., आर.,केबल टी.व्ही. अशा सुविधा आहेत. या माध्यमातून अश्लीलतेची विकृती व्यक्त होत असल्याने तिचा आवाका फार मोठ्या प्रमाणावर दिसतो. फरक आहे तो एवढाच. वैज्ञानिक माहिती, पाश्चात्य देशांप्रमाणे स्त्री-पुरुषांचे मोकळे संबंध, प्रचार आणि प्रसार माध्यमे या सर्व गोष्टी वरवरचे आहेत. मन-शरीराचे अद्वैत आणि परस्पर आदर-प्रेम यावर आधारित स्त्री-पुरुष नात्यांचा अभाव अश्लीलतेच्या गाभ्याशी आहे. दुसऱ्या व्यक्तीचा वापर केला जाणे अथवा जाणून बुजून करणे ही सामाजिक विकृती सर्वदूर एक निराशेचे सावट पसरवीत आहे. एक काळोख सामाजिक जीवन व्यापून राहिला आहे. जोडीला हर एक क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा आणि अनंत विकृती आहेतच. या काळोख्या सावलीचे आणखीन एक प्रतिबिंब सामाजिक पातळीवर चालणाऱ्या छेडछाडीपासून ते बलात्कार आणि दुसऱ्या बाजूस हुल्लडबाजी ते गुंडगिरी या माध्यमातून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यात होते आहे. ही विकृत ‘मर्दुमकी’ जेव्हा बेकारीच्या हातात हात घालून येते, तेव्हा फॅसिझमचा उदय होतोय याची खूणगाठ मनाशी जरूर बांधावी.
पुरुषांची शरीरप्रेमाची विकृती आणि स्त्रियांच्या बाजूने अशरीर प्रेमाची विकृती एकत्र नांदताना कमालीचा अविश्वास उद्भवतो. स्त्रीने शरीर-प्रेमास रुकार दिला, तर पुरुष सदैव तत्पर असल्याच्या ‘स्वानुभवातून’ एक सर्वसाधारणीकरण होते. ‘पुरुषांची जात’ हा अर्थभारित शब्द तयार होतो. केवळ लग्नाच्या किंवा सामाजिक बंधनांमुळे अशरीर प्रेमाचे गोडवे गाणारी स्त्री त्या विकृतीतून बाहेर आली, तर तिचे दुसऱ्या कोणावरही प्रेम असू शकेल ही भीती, त्यापोटी आलेली संशयग्रस्त दृष्टी आणि हेवा-मत्सर हेवा स्त्री आणि पुरुषांमध्ये उद्भवतात. त्यांचा परिणाम स्त्रियांतील-प्रेमाची विकृती चलती ठेवण्यातच होतो. स्त्री-पुरुषांच्या वृत्तीमधील हा विरोधाभास इतका रूजला आहे, की तो निसर्गदत्तच वाटावा, आणि नाईलाजाने नियती म्हणून स्वीकारावा असा झाला आहे.
या परिस्थितीत घरकाम, चित्रकला, संगीत, साहित्य, अध्यात्म, जणू सार्या कृती ढालीसारख्या वापरल्या जाऊ शकतात. अशरीर-प्रेमाची आस असलेल्या स्त्रीने शरीर-प्रेमाला नकार देण्याऐवजी वरीलपैकी काही गोष्टीत व्यग्र असावे, तर पुरुषाने नकार स्वीकारण्याऐवजी स्वतःस वरील गोष्टीत गुंतवून ठेवावे अथवा करिअर करावे असे विचित्र व्यवहार घडतात. जीवन अर्थपूर्ण करू शकणार्या अशा कितीतरी सुंदर गोष्टींची स्वसंरक्षणासाठी तकलादू ढाल होते.
परस्परांना सरळ भिडताना या ढालींचा दुस्वास वाटणे सहज शक्य आहे. खरे म्हणजे हा राग दुसऱ्या व्यक्तीचा आहे हे भान हरपून क्र्न्व्हा , तबला, पुस्तके त्यांचाच राग वाढतो.
वास्तविक पाहता, शरीर-मनाची एकतानता हेच जिवंतपणाचं लक्षण आहे. मनाच्या समाधानासाठी शरीर हे केवळ साधन किंवा शरीर-तृप्ती पूर्णत्वापर्यंत नेण्यास पोषक घटक म्हणजे मन असे देखील शरीर-मनाचे नाते नाही. प्रिय व्यक्तीला डोळे भरून पाहताना मनच तर पाहत असते, स्पर्श केवळ हातांचाच नसतो, योनीच तेवढी प्रेमार्द किंवा लिंगच तेवढे ताररून येत नसते. शरीर आहे, त्यातील सर्व अवयव आहेत, ते जिवंत आहेत म्हणजेच तेथे मन आहे. नाही तर शरीरा प्रेत आहे! शरीराबाहेर कोठे व्यक्तीचे मन असते? जीवंत मानखेरीज शरीर म्हणजे जाळण्या-पुरण्याची किंवा गिधाडांना घालायची गोष्ट. शरीर-मनाची एकतानताच माणसाला सुंदर बनविते. अशी सुंदर व्यक्ति अशाच सुंदर व्यक्तीच्या सान्निध्यात येण्याने दोन्ही सुंदरता झळाळून येतात. प्रेम प्रेम म्हणजे तरी दुसरे काय ? माणसातील विकृती काढून त्याला सुंदर बनवणारी ही किमया आहे. ही किमया साधली ती व्यक्ती धन्य झाली. अन्यांसाठी मग आहेतच करिअर, पैसा, साहित्य, संगीत, चित्रकला, अध्यात्म इत्यादी ढाली, किंवा जीवन अंधारून टाकणारी अश्लीलता.
अश्लील साहित्याचा संबंध असे प्रेम दुर्मिळ असण्याशी, मन-शरीर एकतानता न साधण्याशी आहे. व्यक्तिगत आयुष्यात ही एकतानता साधूनच अश्लील साहित्याची गरज नष्ट करता येऊ शकते. परंतु सामाजिक पातळीवर मात्र अश्लील साहित्याची हकालपट्टी करून एकतानता साधण्यास पोषक वातावरण तयार होऊ शकते. या दृष्टीने काही कार्यक्रम हाती घेताना शृंगार, लैंगिक कल्पनाविश्वांचे खेळ आणि अश्लीलता यांच्या सीमारेषांबाबत मतभेद जरूर होणार. परंतु, या सीमारेषा पार करून निबिड अंधारात नेणारे हिंसात्मक अश्लील साहित्य आज मोठ्या वेगाने फोफावते आहे.केवळ स्त्रीच्याच नव्हे तर पुरुषांच्याही प्रतिमेस विकृतींचे खाद्य पुरवणार्या अशा साहित्यावर परिणामकारक बंदी घालण्याची मागणी आज जरूर मूळ धरू शकेल. ती समाजजीवन सुंदर करण्याच्या आपल्या प्रयत्नांची आजची दिशा आहे. बाकी संधीप्रकाशातील विषयासंबंधी चर्चा होऊ शकतात आणि मतभेद देखील. या साऱ्या रामरगाड्यात व्यग्र असून देखील प्रत्येकाने स्वतःच्या अनुभवांकडे पुन्हा पुन्हा वळून पाहिले पाहिजे. तसे पाहताना भाषा नव्याने घडवली पाहिजे. शृंगारसाहित्याची निर्मिती झाली पाहिजे.
अर्थाने विटाळलेले शब्द शुद्ध करावेत !
शरीर-मनाच्या फारकतीवर आपले सारे व्यवहार. त्या व्यवहारातून घडलेली आणि घडत असलेली भाषा आणि आधी म्हटल्याप्रमाणे शृंगारिक साहित्याची-कलांची गरज या तीन्हीची सांगड व्यवस्थितपणे बसणे अवघड झाले आहे. शब्दांना व्यवहारातील वापरातून अर्थ प्राप्त होतात, हे सत्य स्वीकारणे तर क्रमप्राप्त आहे त्यामुळेच, अशा साहित्यात शब्द कोणते वापरायचे, अर्थवाही शब्द कुठून आणायचे, नवीन कसे घडवायचे, जुने अनर्थकारी शब्द कसे शुद्ध करायचे हे प्रश्न उभे ठाकतात.
शरीर-मनाच्या फारकतीमधून शृंगार, अश्लीलता, बीभत्सता यातील सीमारेषा पुसट झाल्या आहेत. अशरीर-प्रेमाची संकल्पना सोडून दिल्यावर उत्तम शृंगारिक साहित्यात प्रेमळ शरीर अवयवांना शब्द लागणार. मराठीतील शब्द या संदर्भात आठवून पहावेत. त्यांचे अर्थ अनर्थकारी असल्याचे सहज जाणवेल. मग पर्याय म्हणून संस्कृत भाषेतील शब्दांची इंग्रजी शब्दांची उसनवारी सध्या तरी अपरिहार्य ठरते आहे. लिंग, योनी, संभोग, नितंब, वक्ष, स्तन हे शब्द संस्कृत आहे. त्यांना रूढ पर्यायी मराठी शब्द अर्थाने विटाळालेले आहेत. त्यांचा वापर होताच संभोगातील स्त्री सहभागाचा अपमान जणू अटळ होतो. शिव्यांचा वापर करून सहभोगातील आनंदाची जागा आपण वर्चस्व-कनिष्ठत्वाला, दादागिरीला, स्त्री रक्षण करण्याच्या अक्षमतेला बहाल केली आहे.
‘चाराअक्षरी’ इंग्रजी शब्दांचे वर्णन देखील ‘हलकट’ या विशेषणाखेरीज पूर्ण न होणारे आहे. मग इंग्रजीतून शब्द घेताना तांत्रिक पारिभाषिक शब्द उचलायचे. हे शब्द तर मृत शरिराच्या अवयवासदेखील लागू पडणारे. त्यांना अर्थाचा पांडुरोग झालेला. शरीर-मन फारकतीचे बळी ठरलेले हे शब्द शृंगारिक साहित्यात वापरायचे कसे?
उत्तम साहित्यासाठी अर्थाने पुष्ट आणि निरोगी शब्दांची नितांत गरज आहे. ‘अमृताते पैजा जिंकू’ पाहणार्या मायबोली मराठीवर प्रेम असलेल्यांना हे एक आव्हान आहे. विविध वयाच्या मुला-मुलींसाठी, स्त्री-पुरुषांसाठी शृंगाराची गरज आहे. नव रसांचा शृंगाररस ‘राजा’ आहे असे केवळ म्हणून भागणार नाही. व्यवहारातून ते वारंवार सिद्ध व्हावे लागेल
हे आव्हान पेलायचे तर नवे शब्द घडवणे, जुने योग्य वापराने शुद्ध करणे ओघानेच आले. अज्ञानावर आधारित मासिक पाळीचा विटाळ, जातीयतेच्या अमानुषतेवर आधारित विटाळ हे जसे त्याज्य आहेत, अगदी त्याचप्रमाणे अश्लीलतेवर आधारित शब्दांना झालेले अर्थांचे विटाळ देखील त्याज्य आहेत. हे आव्हान पेलताना आपण केवळ भाषाच नाही तर स्वतःलाही सुसंस्कृत बनवून सौंदर्याची झळाळी देणार आहोत.
सुंदर होण्यासाठी
प्रिय व्यक्तीच्या प्रेमाचा साक्षात्कार झाल्यावर विजेप्रमाणे लखलखून आल्यानं सर्वांगसुंदर झालेली माणसं अनुभवली. लैलांना कुरूप ठरविणाऱ्या रूढ सौंदर्य संकेतांना ठामपणे बाजूला सारणारी मजनूची नजर मनातून ढळली नाही. ‘प्रेम होईना तुझ्याने, प्रेम माझे राहू दे’ असे खिन्न मनाने वळचणीचा आश्रय घेणाऱ्या ओळी मन कुरतडत गेल्या. या विरहावर आणि खिन्नतेवर मात करणारा ‘तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का?’ असे आपल्याच भावना प्रेयसीच्या मुखी घालून स्वतःभोवती कल्पनाविश्व साकारणारी सर्जनशीलता पाहून गेली. प्रेम मिळत नाही असे दिसल्यावर ते ओरबाडून घेण्याच्या नादात स्वतःला कुरूप करणारी कृती सहृद्धांना दुखवून गेली. वास्तवात प्रियकर मिळत नाहीसं कळल्यावर ‘(विठ्ठला) तुझ्यासाठी डोईवरचा पदर खांद्यावर घेऊन मी वेसवा होईल’ म्हणणारी जनाबाईची आर्तता मनाला स्पर्शून गेली. सवतीप्रमाणे मुरलीचा दुस्वास करणारे स्त्रीत्व घर करून राहिले. उमलत्या प्रेमार्द योनीपुष्पाची उमलत्या शिवलिंगाप्रमाणे पूजा बांधणारी प्रेमभावना अनुभवली. दृष्टी, वाणी, स्पर्श, गंध आणि श्रवण या संवेदनांमार्फत मनोमनींचा थरार अनुभवला. स्त्री-पुरुष प्रेमा-विरहाचे, स्वातंत्र्य-बळजबरीचे, आसक्ती-मत्सराचे किती अनंत रंग ! एक आयुष्य एक तत्त्वज्ञान, एक विज्ञान, एखादे अध्यात्म, एकांगी विचार, एकारले मानस, निष्प्रभ कायदे.... या साऱ्यांना मिळून तरी मानवी-गुंतागुंतीला गवसणी घालता येईल? जीवनाची व्यामिश्रताचा अथांग; म्हणून शतकांनुशतके आपण या व्यामिश्रतेचा ध्यास शृंगार-साहित्यातून, मंदिरातील मैथुन-शिल्पातून, भक्तीरसातून, चित्रकलेच्या वळणावाळणातून घेत राहिलो. हा ध्यास कशासाठी ?प्रिय व्यक्तीला सुंदर करता करता स्वतःलाही त्या लखलखत्या प्रेमाच्या विद्युत प्रकाशात सुंदर करण्यासाठी आणि ते न जमल्यास जगताना येणाऱ्या कुरूपतेला हळुवारपणे दूर करण्यासाठी ना ? मला तरी असेच वाटते. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी काही तुमच्यापेक्षा वेगळा नाही, म्हणून वाटते, तुमचेही मनोगत थोड्याफार फरकाने माझ्यासारखेच असावे. हा विषय एवढा नाजूक की, शब्दस्पर्श होताच आत निसटून खळळकन खाली पडून विर्दिण व्हावा. शब्दांच्या सौंदर्यावर ओरखडे उमटू द्यायचे नाहीत आणि शब्दांनीच धार वापरून अलगदपणे कुरूपता काढून टाकायची असे ठरवून कागदावर लेखणी टेकविली, अश्लीलतेची अंधारी रात्र जरी आपल्या वाट्याला आली तरी ते काळे ढग दूर व्हावेत, पुढील पिढीला निर्मळ प्रकाश दिसावा यासाठीच्या प्रयत्नांची दिशा शोधण्याचा हा केवळ एक नाममात्र प्रयत्न आहे. यात उणीवा असतील, अति महत्त्वाच्या गोष्टी कदाचित वगळल्या गेल्या असतील. शक्य आहे. परंतु आपण सार्यांनीच थोडा नेट लावला तर …