तर्कदृष्टी, विवेक,
विचार यांच्याशी साध्वी ऋतंभरांच्या भाषणांचा आणि एकंदरच जमातवादी मतप्रणालीचा, काहीही संबंध नसतो. त्या नेणिवांशी नाते जोडू पाहतात, अबोध पातळीवरच्या उर्मिंना हात घालतात, हेतुत:
किंवा नकळत सुप्त गंडांचा – भयांचा वापर करून घेतला. हे सर्व लोकांच्या भाषेत, त्यांच्या पातळीवरची आक्रमकता, त्यांच्याच शिवराळ
पद्धतीने व्यक्त करणार्या ऋतंभरांबद्दल उत्सुकता व कुतूहल निर्माण झाले.
साध्वींच्या लोकप्रियतेची व लोकमान्यतेची कारणे काय याचा जमातवादी राजकारणाच्या
विश्लेषणाद्वारे घेतलेला हा विचार – परिप्लृत वेध-
साध्वी ऋतंभरा हिंदुत्ववादी संघटनांच्या
व्यासपीठावरील एक प्रसिद्ध वक्त्या आहेत. १९९० मधील अयोध्येतील पहिल्या
कारसेवेनंतरच्या प्रचार मोहिमेच्या काळात त्यांना वारेमाप प्रसिद्धी मिळाली. १९९१
च्या मध्यावर्ती निवडणुकांच्या प्रचाराच्या रणधुमाळीत त्या संघ परिवाराच्या
भात्यातील एक प्रभावी अस्त्र म्हणून गाजू लागल्या. उमा भारती व साध्वी ऋतंभरा या
दोन संन्यासिनींनी अनेक सभा गाजविल्या. देशभर त्यांनी झंझावती दौरे केले. अनेक
भाषणे केली. गर्दी खेचणारे व श्रोत्यांना उत्तेजित करणारे अमोघ शस्त्र म्हणून या
काळात त्यांचा उपयोग करण्यात आला. त्यांच्या भाषणांच्या अनेक ध्वनीफिती व ध्वनिचित्रफिती
निघाल्या. जिथे साध्वी ऋतंभरा स्वत: पोचू शकल्या नसतील तिथे किंवा इतरत्र
पुन:प्रत्ययाचा आनंद देण्यासाठी या मुद्रित फितींचा वापर करण्यात आला. त्यांच्या
सभांना मोठी गर्दी जमायची. तासनतास लोक त्या सभेच्या जागी पोचण्याची आणि त्यांच्या
भाषणाची वाट पाहायचे. हशा, टाळ्या, घोषणा यांचे
गजर त्यांच्या भाषणाच्या वेळी जमलेल्या गर्दीतून होत राहायचे. गर्दी उत्तेजित
व्हायची. या गर्दीला उत्तेजित करण्याच्या त्यांच्या शक्तीची प्रचिती पुन्हा एकदा ६
डिसेंबर १९९२ च्या भगव्या रविवारी अयोध्येत आली. झपाटलेल्या कारसेवकांचा आवेश त्या
वाढवीत होत्या. त्यांना अधिकच चेतवीत होत्या. बाबरी मशीद जमीनदोस्त करण्याचा आग्रह
त्या कारसेवकांना करत होत्या. ध्वनीक्षेपण यंत्रणेचा ताबा घेऊन मशिदीवर हल्ला
करण्याचे आदेश जमलेल्या गर्दीला देत होत्या. (याचमुळे त्यांच्यावर अनेक खटले भरले
गेले आहेत.
वर्तमानपत्रांनी देखील साध्वी ऋतंभरांना वारेमाप
प्रसिद्धी दिली. त्यांची लोकप्रियता, त्यांच्या सभांना जपणारी गर्दी, त्यांची वत्कृत्वशैली, त्यांचे संन्यासिनी असणे, त्यांची वेशभूषा. (अगदी पादत्राने देखील), त्यांची
भाषा याबद्दल बरेच काही लिहिले गेले. या प्रसिद्धिने त्यांच्या भोवतालचे वलय अधिकच
गडद झाले. त्यांच्या बद्दलचे औत्सुक्य वाढले. साहजिकच सभांना होणारी गर्दी (व
मुद्रित फितींचा केएचपी(?) वाढली. साध्वी ऋतंभरा हे नाव
हिंदुत्ववादी संघटनांचा प्रभाव असणार्या क्षेत्रात अधिकच गाजू लागले. साध्वी
ऋतंभरा इतक्या लोकप्रिय का झाल्या ? त्यांच्याकडे श्री.
लालकृष्ण अडवाणींचे राजकीय स्थान अथवा वैचारिक स्पष्टता नाही. शिवसेनाप्रमुखांना
पत्रकारिता व नेतृत्व यातून प्राप्त झालेली महत्ता त्यांच्याकडे नाही. त्या
कुठल्याही संघटनेच्या अधिकृत प्रवक्त्या नाहीत त्यामुळे नवीन धोरणे किंवा
कार्यक्रमांच्या घोषणेच्या अपेक्षा ही त्यांच्याकडून नस्ते. त्यांचे धार्मिक स्थान
फारसे महत्त्वाचे नाही. त्यांना कुणी विचारवंत समजत नाही. कुठल्याही आंदोलनाच्या
नेतृत्वाची धुरा त्यांनी कधी सांभाळलेली नाही. तरीही त्या लोकप्रिय झाल्या, गर्दी खेचू शकल्या, श्रोत्यांना भुरळ घालू शकल्या, चेतवू शकल्या. हे त्या मुंबईत, मध्यमवर्गीय
वस्त्यांत देखील करू शकल्या. हे का घडले ? त्यांच्या
व्यक्तिमत्वाची, म्हणजे ते त्यांच्या वत्कृत्वातून जसे प्रकट
होते, त्याची काही वैशिष्ट्ये आहेत. हे एक कारण. दुसरे हे की
त्या उत्तरोत्तर जमातवादी बनत जाणार्या सामाजिक मानसिकतेचे प्रातिनिधिक प्रतीक
होत्या.
साध्वी ऋतंभरांच्या भाषणाची काही ठळक व ढोबळ
वैशिष्ट्ये सहज ध्यानी येतात. त्यांना अभिप्रेत असलेले श्रोते केवळ पुरुष असतात.
त्या ‘हिंदू
बंधू’ ना सतत संबोधित करतात. ‘हिंदू
भगिनी’चा उल्लेख चुकूनही करत नाहीत. त्य तरुणांना आणि
त्यांच्या तारूण्याला हाक घालत असतात. (हिंदीत त्या ‘तरुणाई’ हा शब्द वापरतात.) त्यांचे भाषण अत्यंत आक्रमक असते. सार्वजनिक सभांच्या, संसदिय आचारांच्या शिष्टतेची त्या फारशी तमा बाळगत नाहीत. त्यांची भाषा
सभ्यतेच्या मर्यादांची कसोटी पाहात असते. त्यांचे भाषण आवाहन आणि आव्हान दोन्ही
असते. त्यात पुन्हा पुन्हा पौरुष्य व षंढत्व यांचा उल्लेख असतो. कुठलीही नवी
माहिती, नवे विश्लेषण, नवी जाणीव किंवा
नवा विचार त्यांच्या भाषणात नसतो. त्यांच्या स्वत:च्या मतांच्या/विचारांच्या निकषांवरही आशयाच्या
दृष्टीने त्यांची मांडणी हिणकसच ठरेल. त्यांच्या वत्कृत्वाला एखादा धबधब्याचा वेग
असतो. शब्द आणि वाक्ये एकापाठोपाठ एक क्षणाचीही उसंत न घेता व न घेऊ देता कानावर आदलत
वा ग्रहण होऊ एसएचकेटी नाही. श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्यावरच सारा भर असतो, विचारांना चालना देण्याचा प्रयत्न नसतो, इतकेच
नव्हे तर विचारशक्तीला वावच दिला जात नाही
तरीही किंवा कदाचित त्यामुळे साध्वी ऋतंभरांची भाषणे लोकप्रिय होतात.
तर्कदृष्टी, विवेक,
विचार यांच्याशी साध्वी ऋतंभरांच्या भाषणांचा आणि एकंदरच जमातवादी मतप्रणालीचा, काहीही संबंध नसतो. त्या नेणीवांशीनाते जोडू पाहतात, अबोध पातळीवरच्या उर्मिंना हात घालतात, सुसंस्कृतपणाच्या
मुशीद परिपक्व अथवा प्रगल्भ न झालेल्या आदिम भावना चेतवतात,
हेतुत: किंवा नकळत सुप्त गंडांचा – भयांचा वापर करून घेतात. यातील अनेक घटकांचा
संबंध उत्क्रांत मनुष्यत्वाशी नसून आदिम जीवशास्त्रीय प्रेरणांशी असतो.
साध्वी ऋतंभरांच्या लोकप्रियतेत त्यांचे स्त्री
असणे आणि संन्यासिन असणे या बाबीचाही महत्त्वाचा हातभार आहे. आजचे एकंदर वातावरण सामाजिक
व राजकीय नेतृत्वाच्या हातभार आहे. आजचे एकंदर वातावरण सामाजिक व राजकीय
नेतृत्वाच्या अवमूल्यनाचे आहे. सर्वच नेते व कार्यकर्ते भ्रष्ट, स्वार्थी, अकार्यक्षम, कोते व खुजे आहेत असा सर्वसामान्य
पक्का समज आहे. समाजसेवक सामाजिक कार्यकर्ता हे शब्दही निंदाव्यंजक ठरावे अशी
परिस्थिति आहे. पारंपारिक संघटना व पक्ष यांचा प्रभाव कमी होतो आहे, त्यांची पकड ढिली होते आहे. पारंपारिक राजकारण,
राजकीय संस्था व नेतृत्व यांच्यावरचा विश्वास जाणवेल इतका कमी झाला आहे. यामुळे
सामाजिक व राजकीय संघटना आणि नेतृत्व यांच्या क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.
जेव्हा सामाजिक गरजा पारंपारिक घटक पूर्ण करू शकत नाहीत,
निर्माण झालेली पोकळी भरून काढू शकत नाहीत, तेव्हा त्यांच्या
अधिकच र्हास होतो. नव्या आणि नवीन प्रकारच्या संघटना
अस्तित्वात येतात, पोकळीत पाय रोवतात, पसरतात. अपारंपारिक, अपरिचित, जुने संकेत न जाणणारे किंवा न मानणारे
नेतृत्व उदयाला येते. जुने मार्ग सोडले जातात, जुन्या चौकटी
बाजूला सारल्या जातात, जुने नियम – आचारसंहिता डावलल्या
जातात. सामाजिक – राजकीय चर्चांची भाषा, व्याख्या व भूमी
बदलली जाते. म्हणूनच आज नव्या अस्मितेला नवी आवाहने करणारे संन्यस्त प्रवक्ते
राजकरणाला प्रवेश करू शकले आहेत.
राजकारण
रसातळाला जाते. समाज अधोगतीच्या काठावर येऊन ठेपतो तेव्हा तेव्हा विजनवासाचा त्याग
करून साधू – संत सांसारिक बाबीत हस्तक्षेप करतात, देशाचे – राष्ट्राचे रक्षण करतात. पुनरूत्थान घडवून आणतात असा (गैर) समज
हल्ली पसरतो आहे. विश्व हिंदू परिषद असा प्रचार मूद्दाम करते आहे. साध्वी
ऋरंभरांच्या स्वत:च्याच भाषणात असा उल्लेख येतो. यात ऐतिहासिक सत्याचा
लवलेशही नाही. भारतात कधीही धर्मसत्ताक शासनपद्धती अस्तित्वात नव्हती. संन्यासी
किंवा पुरोहितांची मंडळे कधीही राज्ये चालवीत नव्हती. (‘चाणक्य’ या मालिकेतला कल्पित इतिहास तसे चित्र करतो हे खरे;
पण या मालिकेचे एक उद्दीष्ट संघ परिवाराच्या मतांचा आणि राजकारणाचा प्रसार करणे
हेच होते.) साधूंच्या एखाद्या गटाने अगदी दशकापूर्वी जरी राजकारण, घटना इ. वर भूमिका घेतल्या असत्या तरी त्यांच्या मतांची उपेक्षा, अवहेलना किंवा हेटाळणी सुद्धा झाली असती. आजच्या वातावरणात मात्र
मार्गदर्शन मंडळ व धर्म संसद यांना मोठेच महत्त्व प्राप्त झाले आहे. ( अजून
महाराष्ट्रात परिस्थिती इतकी वाईट नाही. उत्तर भारतात या संघटनांचे प्रस्थ
झपाट्याने वाढत आहे.) या संघटनांतले साधू
प्राचीन काळातले ज्ञानी, ऋषी–मुनी नाहीत, त्यांचा धर्मशास्त्रातील अधिकारसुद्धा संशयास्पद आहे. बुवाबाजी संचयाचे
साधन बनले आहे. त्यामुळे त्याग, विरक्त, संन्यस्तवृत्ती हे गुणही खरे
उरले नाहीत. पण हे सगळे विसरले जाते. साधूंचा कार्यक्रम प्रतिगामी आहे, विशेषत: स्त्रिया, कथित कनिष्ठ जाती यांच्या
हककांवर आणि स्वातंत्र्यांवर गदा आणणारा आहे. आजच्या काळात,
नव-भांडवलाशाहीचा काही प्रभाव पडलेला नाही, पडू शकत नाही असे
मानले जाते. भोवतालचे जग कोसळत असल्यामुळे मूल्यविहीनता व त्या मूल्यविहीनतेची
भीती निर्माण झाली आहे. या भीतीतून शाश्वत व चिरंतन असे काहीतरी शोधण्याचा
अट्टहासाने जतन करून ठेवण्याचा प्रयत्न नकळतच जनसमुदायांकडून होत असतो. यातही एक
प्रचंड गफलत असतेच. धर्माची सनातन मूल्ये, रूढी, परंपरा, नीती-नियम,
निषिद्धतेच्या कल्पना जर कायम राहिल्या तर आजच्या काळातले दैनंदिन जीवनच अशक्य
होईल. त्यामुळे सगळे मुलाचार त्यागलेच जातात. नव-भांडवलशाहीतील स्वकेंद्री
उपभोगवादाच्या, चंगळीच्या, छानछौकीच्या
आड येणार नाही तितकाच धर्म स्वीकारला जातो. घोष परंपरांचा,
शाश्वत मूल्यांचा आणि व्यवहार मात्र आशय – विहिन, नव – सत्वर
– कर्मकांडात्मक, अध्यात्म्यशून्य ‘धार्मिकतेचा’ हा आजचा विरोधाभास आहे. त्यामुळे या नव्या धार्मिकतेचे स्वरूप दिखावटी, प्रदर्शनात्मक, अंध:श्रद्ध,
बजबजलेले, सत्वर असे बनलेले आहे. देवाण-घेवाण, लिलाव, चंगळ, संपत्ती प्रदर्शन
ही या नव्या रूपाची वैशिष्ट्ये झाली आहेत. अशा भक्तांची श्रद्धास्थाने देखील
त्यांना साजेशीच असणार. उच्च मानवी मूल्ये, विचार, विवेक, संयम, मानव प्रेम, त्याग, निष्ठा, तत्त्वज्ञान, अध्यात्म इ. विषयांना महत्त्व देणारे धर्मवेत्ते लोकप्रियतेच्या लाटेवर
आरुढ होणे शक्य नाही. (फारतर त्यांच्या क्षणिक दर्शनाला गर्दी उसळेल. तेही कठीणच
आहे.) चमत्कार करणारे, प्रदर्शन तंत्रे हुकमीपणे वापरू
शकणारे, अतिसरल कर्मकांडांवर भर देणारे, भावना उद्दिपित करणारे साधू, संन्यासीच गर्दी खेचू
शकतात. (दूसर्या प्रकारचे धर्मगुरु सामाजिक – राजकीय विचारांनी प्रतिगामी
नसतात/नसतील असा या मांडणीचा अर्थ बिलकुल नाही.) साध्वी ऋतंभरा या विकृत नव –
धार्मिकतेला आवाहन करतात, तिच्याशी नाते जोडू शकतात, म्हणूनच त्या इतक्या लोकप्रिय होऊ शकतात.
या प्रयत्नांना जोड मिळते ती प्रचलित झालेल्या
समाजकारण / राजकारण यातील साधू/संत/संन्यासी या (भ्रामक) प्रतिमेची. संन्याशांना
संपत्तीचा किंवा सत्तेचा लोभ नसतो, अहंकार किंवा अधिकाराचा मोहही
त्यांना स्पर्श करी त नाही. त्यामुळे खोटे बोलण्याची त्यांना गरज नसते आणि ते
सत्यवाचनी असतात; कुठल्याही प्रकारचा स्वार्थ त्यांच्या मनात
नसतो; म्हणूनच त्यांची उक्ती व कृती ही नि:स्वार्थी, उदात्त व मंगल असते; राष्ट्राचे व समाजाचे हित
इतक्याच त्यांच्या प्रेरणा असतात; धर्मरक्षण हा त्यांचा
एकमेव हेतु असतो इ. समज संन्याशांबद्दल भारतीय मनात दृढ आहेत. (जाहिरातबाजीच्या
युगात आपला माल विकण्यासाठी प्रचलित प्रतिमांचा वापर श्रद्धा वगैरेंना सहज
सोडचिट्ठि देऊन केला जातो. या समाजांचा उपयोग संन्यासीनीच्या पारंपारिक प्रतिमेचा
निश्चित माभ होतो, आणि त्याचा पुरेपूर फायदा त्या आणि/किंवा त्यांचे प्रायोजन उठवतात.
साध्वी ऋतंभरा लाभलेली (झपाटलेली) लोकप्रियता
सर्व राजकारणी संन्याशांना लाभलेली नाही साध्वींच्या व्यक्तिमत्त्वात व वकृत्वात
या लोकप्रियतेची काही कारणे दडलेली आहेत, काही त्या स्त्री आहेत या घटकात
सामावलेली आहेत. आपल्या देशात अजूनही स्त्रियांचा सामाजिक क्षेत्रातील वावर
मर्यादित आहे. राजकारणात प्रसिद्धी मिळालेल्या स्त्रिया बव्हंशी उच्चभ्रू स्तरातील
होत्या. त्यांनी लोकरंजनात्मक राजकारण केले. तरी त्या झुंडीच्या नेत्या नव्हत्या.
लोकांच्या भाषेत, त्यांच्या पातळीवरची आक्रमकता, शिवराळ पद्धतीने व्यक्त करणार्या साध्वी ऋतंभरांबद्दल उत्सुकता आणि
कुतूहल निर्माण झाले. त्यांच्या अपरिष्कृत रांगडेपणामुळे सर्व चेतलेले विकार (आणि
विखार) समर्थनीय ठरू लागले. एका स्त्रीने, ते ही एका
संन्यासिनीने उघडपणे शेळक्या लैंगिक विशेषणांचा वापर करावा यामुळे वेगळाच जोश
निर्माण झाला. तिने सतत पौरुषाला केलेल्या आवाहनाला सामाजिक मान्यता होती. या
उद्दीपनाला उच्च ध्येयांचे आवरण होते. साध्वींच्या सभानाट्याचे स्वरूप सामाजिक
मान्यता पावलेल्या विकृतीचे होते. त्यात पुन्हा विचारांच्या पातळीवर त्यांची
मांडणी बाळबोध व अतिसरल असे. चिरपरिचित, अनेकदा रांगड्या
पातळीवर व्यक्त झालेले व केलेले असेच विचार त्या मांडत. त्यातील सारी क्लिष्टता
परिस्थितिजन्य चिकटपणा त्या काढून टाकीत. (उदाहरणार्थ: हिंदू – मुस्लिम ऐक्य कधीही
शक्य नाही; ते एकत्र गुण्यागोविंदाने राहणे अशक्य आहे.
धर्मनिरपेक्षता/ सर्वधर्मसमभाव यांना पाठपुरावा करणारे भेकड व षंढ आहेत; त्यांचे पितृसंशयास्पद आहे; विचार करत बसणारे, परिपक्व वयाचे लोक हिंदू राष्ट्र उभारू शकत नाहीत इ.) निराश, दडलेल्या आकांक्षानी ग्रासलेल्या तरुणांच्या गर्दीसाठी त्यांची भाषणे
उत्तेजक द्रव्यासारखी ठरायची ती याचमुळे.
साध्वी ऋतंभरा गर्दीच्या आदिम मानसिकतेशी सरळ
आणि स्पष्ट संपर्क साधायच्या. या संपर्कात हुशारी आणि चातुर्यही होते. कळत/नकळत
अबोध व सुप्त पण ठसठसणार्या व विचिलीत करणार्या प्रक्रियांवर त्या आघात
कारणाच्या. त्यांचे आवाहन प्रभावी होते. वंचित असल्याच्या, काही तरी
हिरावले गेल्याच्या अपमानास्पद जाणिवेल (खरे तर नेणिवेला) त्या हाक घालायच्या.
पौरुषाचा उपमर्द झाल्याची भावना त्या तीव्र करायच्या. मग या वंचनेचे व अपमानाचे
रूप त्या विशद करायच्या. यातूनच त्या एका नव्या अस्मितेला - हिंदू अस्मितेला -सद
घालायच्या. ही नवी अस्मिता घडविण्याचा व जागृत करण्याचा हा प्रयत्न असायचा. या अस्मितेचा
अधिक्षेप करणारा शत्रूही त्या कुठचाच आडपडदा न ठेवता सांगून टाकायच्या.
इतिहासाच्या प्रचलित जाणिवेत मुसलमान हा हिंदूंचा शत्रू हे ‘सत्य’ श्रोत्यांच्या गर्दीला सहज पटायचे. पण नुसते मुसलमानांचे नाव घेऊन
त्यांचा कार्यभाग साधण्यासारखा नव्हता. पारंपारिक अन्याय – अत्याचारांची ‘आठवण’ करून देण्यासाठी इतिहासाला आवाहन केले जयचे.
ते गरजेचे होते पण पुरेसे नव्हते. आदि-प्रतिमा (अज्ञान आणि गैरसमजांवर आधारलेल्या)
जागृत करूनही भागण्यासारखे नव्हते. सर्व समस्यांना कारणीभूत शत्रूची नवी सामाजिक व
राजकीय प्रतिमा त्या उभ्या करीत. हे करताना त्यांच्या भाषेला, असंतुलनाला व आक्रमकतेला बाहर यायचा. हिंदूंचे शत्रू मुसलमान वांशिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या हिणकस, कनिष्ठ दर्जाचे, सर्व अवगुणाचे पुतळे असेच आहेत.
सहिष्णू हिंदू इतर सर्व जमाती व धार्मिक गट यांच्याबरोबर गुण्यागोविंदाने राहू
शकतात; समस्या केवळ मुसलमानांबरोबरच्या संबंधात आहे आणि ती
त्यांनी निर्माण केलेली आहे असा आग्रही दावा साध्वी ऋतंभरा करतात. मुसलमान
चालीरीतींनी, संस्कृतीने, शिक्षणाने, सामाजिक/धार्मिक श्रद्धांनी मागासलेले व जवळ जवळ रानटी आहेत.(“ते
प्रत्येक गोष्ट हिंदूंच्या उलट करतात.”) त्यामुळे ते बुरसटलेले, घाणेरडे, मागासलेले, पशूवत, असहिष्णु आहेत. स्वभावत:च ते हिंस्त्र, हिंसक, क्रूर, द्यायमाया नसलेले,
लिंगपिसाट, कुठल्याही विधिनिषेध न बाळगणारे असे आहेत. पाशवी
बळाचा प्रचंड साठा त्यांच्याकडे आहे. धर्मांध असल्यामुळे ते सतत धर्मयुद्ध पुकारत
असतात. या धर्मयुद्धात अनन्विय अत्याचार करणेच ते श्रेयस्कर समजतात. जगातील सर्व
मुसलमानांना त्यांना सक्रिय – आर्थिक, साधनसामुग्रीचा
पाठिंबा आहे. त्या कृतघ्ंनानी हिंदूंचे उपकार, औदार्य, उमदेपणा, पाहुणचार सर्व विसरून हिंदूंविरुद्ध
जागतिक कारस्थान रचलेले आहे. या कारस्थानात हिंदूंच्या सर्व शत्रूंची छुपी अथवा
उघड मदत मिळत असते. हिंदूंची एकमेव मायाभूमी नष्ट करण्याचा,
हिंदूंचे अस्तित्वच पुसून टाकण्याचा त्यांचा कट आहे. हिंदूंवरचे हे अत्याचार ते
शतकानुशतके करतच आले आहेत. त्यांच्या ताकदीला ताबडतोब आवर घातला नाही तर हिंदूंची
धर्म, त्यांची पवित्र स्थळे, त्यांचे
जीवित, त्यांची संपत्ती, त्यांच्या
स्त्रियांचे पावित्र्य धोक्यात येईल, नष्ट होईल. स्वत:च्याच
भूमीत पुन्हा एकदा गुलाम बनून जगण्याची पाळी हिंदूंवर येईल. आजच त्यांच्यावर
निर्वासितांचे लाजिरवाणे जिणे कंठण्याची पाळी मुसलमानांनी आणली आहे. सबंध मुसलमान
समाजाचे विकृत चित्र साध्वी ऋतंभरा (आणि त्यांच्यासारखे इतर वक्ते) उभे करतात.
प्रत्येक ज्ञात व अज्ञात भयाला हात घालण्याची ही प्रतिमा त्या उभी करता. सर्व
दुर्गुण शत्रूच्या माथी मारले आणि त्याला भयंकर, आक्रमक,धोकादायक ठरविले की गर्दीला भडकविणे सोपे जाते. परंतु शत्रूचे निव्वळ
भयप्रद स्वरूप दाखविणे पुरेसे नसते. त्याचा उलटही परिणाम होऊ शकतो. भायगंड बळावला
तर भेदरून जाऊन शक्तीहीन बनतील, कृतीचे सामर्थ्य गामवून
बसतील. साध्वी ऋतंभरांचे चातुर्य हे नीट ओळखून आहे. त्यामुळे त्या इतक्यावर न
थबकता पुढे सरकाता. शत्रू बलाढ्य असला तरी कनिष्ठ दर्जाचा आहे. वेळीच पावले उचलली
तर त्याला विजयी होणे शक्य नाही हा दिलासा त्या स्वत:च्या झुंडींना देतात.
हिंदूंच्या आंतरिक सामर्थ्यापुढे हा शत्रू निष्प्रभ ठरणारच हा विश्वास त्या हिंदू
जमावांना देतात. शत्रूला त्या हास्यास्पददेखील ठरवतात. त्याच्याबद्दलचा तिरस्कार
कायम ठेवतानाच त्या शत्रूची टर उडवतात. (भाषेची चावरेपणा,
प्रसंगी ग्राम्य व शिवराळ होऊ शकणारा उपरोधिक विनोद यांनी त्यांना या कामात साथ
मिळते.) त्यामुळे शत्रू अजिंक्य ठरत नाही. ‘प्रबळ पण जिंकता
येण्यासारखा शत्रू’ ही प्रतिमासुद्धा हिंत्र्य पौरुषाला
सुखावते. आक्रमक युद्धातुर पुरुषी अहंकारला दोजारते. शत्रू बलाठ्य आहे. चलाख, घातकी व क्रूर आहे पण चिरडून टाकता येण्याजोगा आहे हा विश्वास हिंदू
तरुणांना देण्याचा प्रयत्न साध्वी ऋतंभरा करतात. निश्चित परंतु अतिसोप्या विजयाची
खात्री युद्धपिपासू उत्तेजना वाढवते. ‘शत्रू’चे असे स्वरूप एकदा ‘सिद्ध’
झाले की वेगळा विचार मांडणारे सगळेच धर्मद्रोही. स्वजनद्रोही, देशद्रोही ठरवता येतात. स्वत:च्याच तर्काच्या अनुषंगाने मग साध्वी ऋतंभरा
गद्दार सूर्याजी पिसाळांना निकालात काढू शकतात.
साध्वी ऋतंभरांबद्दल विवेचन करताना एक मुद्दा
मात्र सतत लक्षात ठेवला पाहिजे. साध्वी प्रभावी वाक्त्या ठरल्या, गर्दीला
भुरळ पडू शकल्या, कृतीसाठी चेतवू शकल्या. परंतु हे त्यांनी
एका लाटेवर आरुढ होऊन केले. ती लाट त्यांनी निर्माण केली नव्हती. ती लाट पद्धतशीर
व योजनाबद्ध रीतीने उत्पन्न केली गेली होती. समस्त संघ परिवाराने प्रचार, प्रतिकात्मक कृती (उदा. रामशिलान्यास) इ. मार्गांनी पूर्वतयारी केली
होती. वाटवरणाला लाटेचे स्वरूप दिले श्री. लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेने साध्वी
ऋतंभरांनी त्या लाटेला झगझगीत आक्रमक धार दिली. ती लाटच नसती तर त्यांचे वकृत्व
उद्दीपक व प्रभावी न ठरता निव्वळ आक्रस्ताळे बरळणे ठरले असते.
साध्वी ऋतंभरांनी वापरण्यासाठी मिळाले ते एक
तयार,
मान्यता पावलेले प्रतीक ‘श्री राम’ हे
प्रतीक नवीन घडवलेल्या ‘हिंदू’
अस्मितेचे सम्यक प्रतिनिधित्व करीत होते. किंबहुना या प्रतिकाची निर्मिती व या
अस्मितेची घडण यात एकवाक्यता व एकात्मता होती. पुन्हा हे प्रतीक निव्वळ उदघोषाचे साधन
नव्हते. त्याच्याशी निश्चित, प्रत्यक्ष, सगुण-साकार, आक्रमक वृत्ती निगडित होती. बाबरी
मशिदीचा विनाश आणि राममंदिराचे निर्माण या एक कलमी कार्यक्रमाची हाक साध्वी ऋतंभरा
देत होत्या. एक कलमी, एकाघाती कार्यक्रमाची विचार, दृढ निश्चियी, प्रदीर्घ सामाजिक-राजकीय संघर्षाची तयारी
असलेल्या संघटित समुदायांची, जनसंघटनांची गरज नसते.
झपाटलेल्या, त्या क्षाणपुरता, त्या
उद्दिपित झालेल्या समूह आणि एखादे कृतनिश्चियी, अतिरेकी, धडक दल इतक्याच आधारावर (मुख्यत: नकारात्मक विनाशी) एक कलमी कार्यक्रम
पार पडता येतो. धडक दलांचे संघटन संघ परिवारातील सुसज्ज संघटनांनी केले असावे.
समुदायांना उद्दिपित करण्याचे कार्य साध्वी ऋतंभरांसारख्या मैदानी वक्त्यांनी केले.
हे काम कमी लेखता कामा नये. 6 डिसेंबर १९९२ ल अयोध्येत प्रचंड, उत्तेजित, झापाटलेली गर्दी जमणे आवश्यक होते. ती तर
धडक दलातले ‘योध्दे’ मूठभर
अतिरेक्यांप्रमाणे वेगळे पडले असते. जमान्यतेचे जे संरक्षण कवच प्राप्त झाले ते
झाले नसते. तितका जमाव त्या दिवशी अयोध्येत नसतं तर कदाचित सर्व लोकशाही संस्थांची
पायमल्ली करत बाबरी मशीद पाडण्याचे धैर्य धडक दलाला किंवा त्याच्या प्रायोजकांना
झाले नसते. आणि समजा झाले असते त्याची जबर राजकीय किंमत भा.ज.प. व संघ परिवाराला
द्यावी लागली असती. भा.ज.प. ला तर आताचा आक्रमक प्रवित्रा घेताच आला नसता. कदाचित
राष्ट्राची व जनतेची क्षमायाचना भा.ज.प.ला करावी लागली असती अशा नामुष्किची पाळी
ओढून न देण्याची कामगिरी साध्वी ऋतंभरांसारख्या उत्तेजकांनी पार पडली. आजची
सामाजिक-राजकीय परिस्थिति उत्पन्न करण्यात या कामगिरीचे योगदान किती महत्त्वाचे
आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यांनी निव्वळ एक संदेश समुदायांपर्यंत पोचवला
नाही; जमाव एकत्र केले नाहीत तर निर्णायक संघर्षाची हाक
प्रभावीपणे जनतेला दिली. एकाच निश्चित कृतीतून शतकांच्या कथित उपमर्दाची भरपाई
करण्याचा, नपुंसकत्वाचा दाग पुसून काढण्याचा विश्वास
समुहांना दिला. तसा निर्धार करण्याचे सामर्थ्य दिले.
नेनीवांचा, अबोध उर्मींचा उल्लेख यापूर्वी
आलाच आहे. या मानसिक प्रक्रिया कोणत्या याविषयी काही आडाखे बांधणे आवश्यक आहे.
कुठल्या प्रकारची मानसिकता आक्रमक, हिंसक जमातवाद सामाजिक
पातळीवर निर्माण करते याबद्दल चर्चा होणे महत्त्वाचे आहे. काही गोष्टी बर्याच
प्रमाणात स्पष्ट आहेत. (साध्वी ऋतंभरांच्या व्यक्तिमत्वातून व वक्तृत्वातून याच
मानसिकतेशी संवाद साधला जातो.) साध्वी त्यांच्या श्रोत्यांत परिपक्व, प्रगल्भ पौढ व्यक्तिमत्व शोधत नाहीत. किंबहुना त्याचा उठवच होऊ देत
नाहीत. त्या साद घालतात त्या अपरिपक्व, विचारशक्तीचा पूर्ण
वापर अजून करू न लागलेल्या बालकाला श्रोत्यांना अर्भकावस्थेतल्या स्वप्नरंजनात
गुंतूवून ठेवण्याचा यात प्रयत्न असतो. यातली काही स्वप्न आत्मकेंद्री, स्वत:च्या महत्त्वाच्या भ्रमात गुतलेल्या, सतत
सुखादायी तुष्टीकरणाची मागणी करणारी असतात. काही इतर भयप्रद असतात. ती पछाडणारे
बागुलबुवा उत्पन्न करतात. कोपर्यातील सावल्यांना भयंकर,
सर्वभक्षक, हल्लाखोर भुतांची रुपे देतात. अर्भकावस्थेतील
श्रोते विचार करू इच्छित नाहीत. प्रश्नांची दुसरी बाजू पाहू शकत नाहीत. त्यांना
गोळीबार निश्चित उत्तरांचा ध्यास असतो. ही उत्तरे जितकी सोपी तितके ते जास्त खूप
अतिसरल, विकारक्षम मनाची ही लक्षणे आहेत हे उघड आहे.
अनिश्चितता, विलंब, नकार, चिंता, विरोधाभास, अंतर्विरोध
यांना तोंड देण्याची शक्ती व सहनशिलता त्यांच्यापाशी नसते. मग हे कांगावखोर त्रागा
करते. स्वत:च्या अपूर्णतेची त्रुटींची जाणीव मान्य नसलेल्या सर्व दुर्गणांचे आरोप
कुठल्या तरी बाह्य घटकावर करते आणि मग त्या भयप्रद रूपाला घाबरून किंचाळू
लागते.त्याची मागणी सततच्या तृष्टीकरणाची असते. काही न
मिळाल्यास त्याला प्रचंड अन्याय जाणवतो आणि त्या परिस्थितीचे खापर ते दुसर्या
कुणावर तरी फोडते कारण स्वत:ची त्रुटी ही कल्पना त्याला मान्य नसते.
साध्वी ऋतंभरा याच मांनोवृत्तीला खतपाणी घालतात.
खच्चीकरणाची भीती उत्पन्न करतात, बागुलबुवे दाखवतात. त्यांच्या सांगण्याप्रमाणे
कृती करणार्यांना स्वर्गीय सुखाचे आमिष दाखवतात. प्रौढत्व,पौरुषी
प्रगल्भतेचे ते लक्षण असल्याची खात्री देतात. याच बरोबर एक गर्भित धमकी देखील त्यांच्या मांडणीत असते.
त्यांचे न ऐकणार्याला वाळीत टाकण्याची, त्याच्या वाट्याचे
स्तन्य हिरावून घेण्याची, त्याला पंढत्वाची शिक्षा देण्याची
ही धमकी असते.
ही मानसिकता वाटेल त्या वेळी समाजात पसरत नाही
मान्यता पावत नाही. नव भांडवलशाहीच्या अडखळण्याच्या काळात या वृत्तींचा
प्रादुर्भाव फैलाव होतो. म्हणून या कालखंडात आक्रमता, हिंसक
जमतवादाचा धोका-फाशीझमचा धोका-भीतीदायक पातळीवर असतो.